*खंडाळा गावातील पांधन रस्त्याचे दोनदा भुमिपुजन होऊन ही कामाच्या प्रतिक्षेत*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – खंडाळा गावातील पांदण रस्ता कामाच्या प्रतिक्षेत असुन या रस्त्याचे भुमिपूजन आमदार आशिष जयस्वाल यांनी दोनदा केले आहे पण पावसाळाजवळ येऊन ही पांदण रस्त्याच्या कामाला हात न लागल्याने शेतकर्यात व नागरिकान मध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
खंडाळा ते गहू हिवरा या रस्त्यावरून श्री विनायक हटवार यांच्या शेताच्या बाजुने पश्चिमेकडे एक पांदण रस्ता गेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा पांदण रस्ता दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळे पावसा ळ्यात या पांदन रस्त्यावरून वहिवाट करण्याकरिता शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. अनेकदा पाय घसरून पडणे, बैलबंडी फसणे इत्यादी प्रकार दरवर्षी होत असतात. हा प्रकार आमदार आशिष जयस्वाल यांचा निदर्शनात ग्रामस्थांनी आणला असता सदर पांदन रस्ता बनवुन देण्याचे आश्वासन दिले. व गेल्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी तसेच ३ एप्रिल २०२१ ला आमदार आशिष जयस्वाल यांच्या वाढदिवसा निमित्त असे दोनदा उद्घाटन आमदार आशिष जयस्वाल यांनी केले. चार दिवसात कामाला सुरुवात होईल असे उद्घाटन प्रसंगी सांगण्यात आले होते. पण महिना झाला नंतर ही कामाला सुरुवात झाली नाही. पावसाळा जवळ आला आहे अशा परिस्थितीत नेहमीप्रमाणे यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांना अनेक अडचणी सहन कराव्या लागणार काय असा प्रश्न निर्माण झाला आहे ? वहिवाटी ला रस्ता नसल्यामुळे जमीन पडीत ठेवावी लागणार काय असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहे.