*कन्हान येथे विविध संघटने द्वारे बुद्ध पोर्णिमा थाटात साजरी*

*ठिक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि -ॠषभ बावनकर
कन्हान : – तथागत गौतम बुद्ध पौर्णिमा दिवस निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे नाका नं. सात येथील सुजाता बुद्ध बिहार येथे करुन तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला पुष्पहार व पुष्प अर्पित करून बुद्ध वंदनेसह अभिवादन करित बुद्ध पोर्णिमा थाटात साजरी करण्यात आली.
बुधवार दिनांक २६ मे २०२१ ला बुद्ध पौर्णिमा निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन नाका नं. सात सुजाता बुद्ध बिहार येथे करुन मंच महासचिव संजय रंगारी यांनी तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी मंच अध्यक्ष प्रविण गोडे व मंच सचिव प्रदीप बावने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. उपस्थित सर्व मंच पदाधिकार्यांनी बुद्ध वंदनेसह तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन करीत बुद्ध पोर्णिमा थाटात साजरी करण्यात आली. या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रविण गोडे, उपाध्यक्ष ॠषभ बावनकर, सचिव प्रदीप बावने, महा सचिव संजय रंगारी, हरीओम प्रकाश नारायण, प्रकाश कुर्वे, सोनु खोब्रागडे सह मंच पदाधिकारी उपस्थित होते.

*बोधी वृक्ष वाटप करून बुद्ध पोर्णिमा थाटात साजरी*
कन्हान : – बुद्ध पौर्णिमा व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्य कन्हान येथील समाज बांधवांनी आंबेडकर चौक कन्हान येथे तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मान्यवरांच्या हस्ते बोधी वृक्षाचे (पिंपळाचे) वाटप करून बुद्ध पौर्णिमा थाटात साजरी करण्यात आली. या प्रसंगी कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस स्टेशन अरूण त्रिपाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे चंद्रशेखर भिमटे, रमेश गोडघाटे, शालीकराम महाजन, शरद गिते, मोरेश्वर खडसे, अशोक पाटील, नरेश सोनेकर, निखिल रामटेके, पंकज रामटेके, प्रमोद मालाधरे, अभिजित चांदुरकर, अजय चव्हान, कुणाल खडसे सहित पोलीस व समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.

*चंदन मेश्राम मित्र परिवार द्वारे बुद्ध पौर्णिमा थाटात साजरी*
कन्हान – बुद्ध पौर्णिमा व बुद्ध जयंती निमित्य चंदन मेश्राम मित्र परिवार द्वारे कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष काॅंग्रेस कमेटी कन्हान शहर महिला अध्यक्ष रिता बर्वे व प्रमुख अतिथि कन्हान पोलीस स्टेशन चे एपीआई अमितकुमार आत्राम यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात नागरिकांना मास्क , अन्न धान्य वाटप करण्यात आले . कार्यक्रमात उपस्थित सर्व नागरिकांनी तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन बुद्ध वंदना करीत बुद्ध पौर्णिमा थाटात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी कन्हान पोलीस स्टेशन चे जयलाल सहारे , विरेंन्द्र चौधरी , रोहित बर्वे , चंदन मेश्राम , दिपक तिवाडे , सुमित जांबुळकर , दामु पात्रे , प्रकाश देवांघण , गणेश खांडेकर , विनोद मसार , महाविर यादव , क्रिष्णा रोडेकर , अक्षय फुले , सह आदि नागरिक उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज