Breaking News

*कन्हान येथील संजीवनी कोव्हिड सेंटर ला तहसीलदार सहारे यांची भेट* *कोव्हिड केअर सेंटरला त्वरित इतर व्यवस्था उपलब्ध करू – तहसीलदार वरुणकुमार सहारे*

*कन्हान येथील संजीवनी कोव्हिड सेंटर ला तहसीलदार सहारे यांची भेट*

 

*कोव्हिड केअर सेंटरला त्वरित इतर व्यवस्था उपलब्ध करू – तहसीलदार वरुणकुमार सहारे*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : –कन्हान शहरात व परिसरात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असुन शहरात गोरगरीबांना पाहिजे तशी आरोग्य सेवा उपलब्ध होत नसल्याने नागरीकांची कन्हान ला कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी असल्याने दिनांक.१७ मे ला कोव्हिड केअर सेंटर चा शुभारंभ होऊन आठ दिवसांनी पारशिवनी तहसीलदार वरुणकुमार सहारे यांनी भेट देऊन संपुर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन संबंधित अधिकार्यांशी चर्चा करून त्वरित इतर सुविधा उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले.

कन्हान शहरात व परिसरात कोरोनाच्या उपचारार्थ गोरगरिबांना चांगलाच त्रास सहन करावा लागला असुन कित्येक लोकांना योग्य उपचार न मिळाल्याने आणि कन्हान पासुन नागपुर चे अंतर लांब असल्यामुळे रुग्णालयात पोहोचण्या अगोदर कित्येक लोकांचा मृत्यु झाला. कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात करण्याकरिता शहातल्या काही सामाजिक कार्यकर्ता सह संजीवनी कोव्हिड केअर सेंटरचे संचालक सौ.शीतल मुकेश चौधरी व तुषार फडणवीस यांच्या प्रयत्नाने सोमवार दिनांक .१७ मे २०२१ ला दुपारी १२ वाजता नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरील विजय मॉर्केट येथील डोणेकर सभागृह येथे संजीवनी कोव्हिड केअर सेंटर चा शुभारंभ करण्यात आला असुन आता पर्यंत पाच रुग्ण बरे झाले असल्याने मंगळवार दिनांक.२५ मे २०२१ ला दुपारी २:०० वाजता तहसीलदार वरुण कुमार सहारे यांनी संजीवनी कोव्हिड केअर सेंटर ला भेट देऊन संपुर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन संचालक सौ.शीतल मुकेश चौधरी व तुषार फडणवीस यांच्याशी चर्चा करून प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान चे डॉ योगेश चौधरी यांच्या सहकार्याने कोरोना चाचण्या, रुग्णांची भर्ती, बेड्स, ऑक्सीजन व कोव्हिड केअर सेंटर ला लागणारे इतर सुविधा, व्यवस्था संबंधित अधिकार्यांशी चर्चा करून त्वरित उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन तहसीलदार वरुणकुमार सहारे यांनी दिले. याप्रसंगी मंडळ अधिकारी व कोव्हिड केअर सेंटर चे डॉक्टर, नर्स व सहकारी उपस्थित होते.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …