Breaking News

*ऑर्चिड लॉज येथे नियमाचे उल्लंघन केल्याने कन्हान पोलीसांनी केली कारवाई*

*ऑर्चिड लॉज येथे नियमाचे उल्लंघन केल्याने कन्हान पोलीसांनी केली कारवाई*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कांन्द्री येथील ऑर्चिड लॉज मध्ये कोव्हिड-१९ शासनाच्या प्रतिबंध नियमाचे पालन न करित क्षमतेपेक्षा जास्त महिला व पुरूषांना प्रवेश दिल्याच्या गुप्त माहिती वरून कन्हान पोलीसांनी केलेल्या तपासणीत लॉज मध्ये संचारबंदी व शासनाच्या नियमावली चे उल्लंघन केल्याचे आढळुन आल्याने ही कारवाई करण्यात आली.


मंगळवार (दि.२५) मे ला सायंकाळी ५ वाजता दरम्यान कन्हान पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून कन्हान पोलीस निरिक्षक यांचे आदेशाने पोलीसांनी जाऊन नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ कांन्द्री येथील ऑर्चिड लॉज येथे जाऊन तपासणी केली असता वातानुकुलीत व अवातानुकुलीत खोल्या असुन क्षमतेपेक्षा जास्त महिला व पुरूष मिळुन आल्याने तसेच आरोपीने कोव्हिड-१९ (आरटीपी सीआर) तपासणी केली नसल्याचे दिसुन आल्याने आरोपीने मा.श्री जिल्हाधिकारी तसेच शासनाच्या नियमाचे कोणतेही पालन न केल्याचे दिसुन येत नसल्याने आरोपीने संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करून कोरोना विषाणुचा संसर्ग पसरविण्याचे हयगयची कृती होईल अशा पध्दतीने लॉज चालु ठेवल्याने कन्हान पोलीसांनी आरोपी आकाश प्रकाश कापसे वय २३ वर्ष राहणार सोनी ले आऊट कांन्द्री यांचे विरूध्द अपराध क्रमांक १५१/२१ कलम १८८, २६९, २७० भादंवि सहकलम २, ३, ४ साथीचे रोग अधिनियम नुसार गुन्हा नोंद करून तपासात घेतला. ही कारवाई कन्हान पोलीस निरिक्षक अरूण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात पो उपनिरीक्षक सुनिल अंबरते, पोलीस शिपाई सुधिर चव्हाण, आतिश मानवटकर यांनी ही कारवाई यशस्विते रित्या पार पाडली.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …