*कांन्द्री येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथका ने मुद्देमाला सह चोरीच्या आरोपीला पकडले*
*कारवाई करुन कन्हान पोलीसांना केले स्वाधीन , आरोपी जवळुन ४ नळे सह एकुण ११,००० रुपयाचा माल केला हस्तगत*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत हनुमान नगर येथे फिर्यादी दिपक जर्नाधन ढोबळे यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरु असलेल्या बाथरुम मध्ये लावण्यात आलेले ४ नळे व ३ कटन मशीन सह एकुण १४,००० रुपया चा माल कोणीतरी अज्ञात आरोपी ने चोरुन नेल्याने फिर्यादी दिपक जनोदन ढोबळे यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार रविवार दिनांक २३ मे २०२१ चे ०८:०० वाजता या सोमवार दिनांक २४ मे २०२१ चे १०:०० वाजता च्या सुमारास अज्ञात आरोपी ने फिर्यादी दिपक जर्नाधन ढोबळे वय ४२ वर्ष राहणार हनुमान नगर कन्हान यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरु असलेल्या घराच्या बाथरूम मध्ये लावण्यात आलेले जगवार कंपनीचे ४ नळे उघडुन नेल्याने चार नळाची एकुण किंमत ११,००० रुपये व ३ कटर मशीन किंमत ३००० रुपए असा एकुण १४,००० रुपयाचा माल चोरी गेल्याने फिर्यादी दिपक जर्नाधन ढोबळे यांच्या तोंडी रिपोर्ट वरुन सदर गुन्हा नोंद करून तपासात घेतला व पोलीस स्टेशन ला येऊन अज्ञात आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक १५३/२०२१ कलम ३८० भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला .
सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण यांनी आरोपी विशाल मिलींद नितनवरे वय ३० वर्ष राहणार जवाहर नगर कन्हान याला पेश केले व कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांचा मार्गदर्शनात नापो राहुल रंगारी , संदीप गेडाम , पोशि संजय भदोरिया , सुधीर चव्हान , यांनी गुन्ह्यात चोरी गेलेला माल जगवार कंपनीचे ४ नळे उघडुन नेल्याने चार नळाची एकुण किंमत ११,००० रुपयाचा माल हस्तगत केला .
Maharashtra News Media सच की आवाज