Breaking News

*कन्हान, साटक, पारशिवनी आरोग्य केंन्द्राला माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली भेट* *आढावा घेऊन डॉक्टरांशी सोयी सुविधाची केली चर्चा*

*कन्हान, साटक, पारशिवनी आरोग्य केंन्द्राला माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली भेट*

*आढावा घेऊन डॉक्टरांशी सोयी सुविधाची केली चर्चा*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – पारशिवनी तालुक्यात कोरोना ची दुसरी लाट आटोक्यात येत असुन माजी मंत्री व भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री मा. श्री चंन्द्रशेखर बावनकुळे यांनी पारशिवनी तालुक्यातील कन्हान, कांन्द्री, टेकाडी, साटक व पारशिवनी प्राथमिक आरोग्य केंन्द्रात जाऊन आढावा घेतला व डाॅक्टरांशी सोयी सुविधा ची चर्चा करून कोरोनाची तिसरी लाट येण्यापुर्वी नागरिकांन करिता प्राथमिक आरोग्य केंन्द्रात आवश्यक सोयी सुविधा ची व्यवस्था करण्यास सांगितले.


देशात, राज्यात, जिल्ह्यात तालुक्यात व शहरात कोरोनाचे थैमान चांगलेच पसरल्याने तालुक्यात नागरिकांना पाहिजे तशी आयोग्य सेवा उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत असुन किती तरी लोकांना योग्य उपचार न मिळाल्याने किती तरी लोकांचा मृत्यु झाला आहे. त्या अनुषंगाने माजी मंत्री व भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री मा.श्री चंन्द्रशेखर बावनकुळे हयांनी शुक्रवार दिनांक .२८ मे २०२१ ला दुपारी १ वाजता प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान ला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेऊन वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश चौधरी यांचाशी सोयी सुविधाची चर्चा करून शहरातील नागरिकांचे लसीकरण पुर्ण करण्याकरिता नागरिकांच्या घरी जाऊन व पथनाट्य द्वारे जनजागृती अभियान राबविण्यात यावे. कोरोना ची तिसरी लाट येण्यापुर्वी प्राथमिक आरोग्य केंन्द्र येथे आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करण्यास सांगितले. कन्हान येथील संजीवनी कोव्हिड सेंटर व वेकोलि चा जवाहरलाल नेहरू चिकित्सालय कांन्द्री ला भेट देऊन परिस्थिती चा आढावा घेऊन कोव्हिड सेंटर ला अति आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले. आणि जवाहरलाल नेहरू चिकित्सालया च्या डाॅक्टरांशी चर्चा करून कोरोना संसर्ग रोगापासुन नागरिकांचे जीव वाचविण्याकरिता योग्य उपाय योजना करायला सांगितले. प्राथमिक आरोग्य केंन्द्र साटक ला भेट देत परिस्थिचा आढावा घेऊन डाॅक्टरांशी चर्चा करून कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना करिता नागरिकांत जनजागृती करून लस घेण्याकरिता कडकळीचे आवाहन करण्यास सांगितले. त्यानंतर ग्रामिण रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंन्द्र पारशिवनी येथे भेट देऊन संबंधित अधिकार्यांशी चर्चा करून कोरोनाच्या तिसरी लाट येण्यापुर्वी संपुर्ण तालुक्याच्या प्राथमिक आरोग्य केंन्द्रात तातडीने उपाय योजना करून नागरिकांना तात्काळ उपाय योजना करून सोयी सुविधासह सेवा देण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी माजी आमदार डी मल्लीकार्जुन रेड्डी, भाजपा जिल्हा महामंत्री अजय बोढारे, जयराम मेहरकुळे , राहुल किरपान , श्री.श्री.फाउंडेशन चे अध्यक्ष संकेत बावनकुळे, भाजप नेता राजेश ठाकरे, तालुका अध्यक्ष अतुल हजारे, जिल्हा परिषद सदस्य व्यंकटेश कारेमोरे, शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक, नगरसेवक राजेंन्द्र शेंदरे, नगरसेविका सुषमा चोपकर , रिंकेश चवरे, शैलेश शेळकी, धर्मेंद्र गणवीर, कामेश्वर शर्मा, सुनिल लाडेकर, अमिष रूंघे, अमोल साकोरे, संजय चोपकर , मयुर माटे, सौरभ पोटभरे, अजय लोंडे, ऋृषभ बावनकर , महादेव किरपान, लिलाधर बर्वे, प्रतिक वैद्य सह आदि भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …