*मायक्रो फायनान्स कंपनी करतेय पठाणी वसुली*
*व्यवसाय बंद , रक्कम भरायची कशी ?*
नरखेड प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे
नरखेड – लॉकडाऊन मुळे अनेकाकडे व्यवसाय नाही. अश्या परिस्थितीत मायक्रो फायनांन्स कंपण्यांनी बचत गटांना दिलेल्या पैश्याची पैठणी वसुली सुरु केली आहे. नरखेड तालुक्यातर्गत मोवाड , जलालखेडा व सावरगाव या भागात मागील काही वर्षापासून महीला बचत गटांना विविध बँका व मारक्रो फायनांन्स कंपन्यातर्फे रक्कम कर्ज देण्यात आले. ही रक्कम घेऊन त्यांनी छोटे व्यवसाय सुरू केले. मात्र कोरोना वर आळा घालण्यासाठी राज्य सरकारणे लॉकडाऊन लावले. मागील वर्षी सुरू झालेल्या कोरोनामुळे ६ महीन्यापेक्षा जास्त काळ व्यवसाय बंद राहले.
त्यामुळे अनेक छोटे व्यवसायिकांना बचटगटाकडून तर बचटगटांनी मायक्रो फायनांन्सकडून घेतलेले कर्ज भरायचे कसे ? असा छोट्या व्यावसायिकांसह बचतगटांनाही पडलेला आहे.
मायक्रो फायनान्स कंपण्यांनी बचत गट तयार करून कर्ज वाटप केले. व त्या बचत गटांना कर्ज दिले. तर काही महीलांनी तर एक नव्हे तर तिन – चार कंपण्याकडून कर्ज घेतले. कर्जाचे हफ्ते आठवडी , पंधरवाडी तर मासिक भरावे लागते. परंतु अर्थव्यवस्था बिघडल्याने हि रक्कम भरणे कठीण आहे. शासनाने या पठाणी वसुलीलि काही महिने सवलत द्यावी , अशी मागणी अनेक कुटुंबानी केली आहे.

प्रतिक्रिया ;
मी ३.५० लक्ष रुपये सोलमंडलम फायनांन्स कडून कर्ज घेतले होते . मार्च पासून लॉकडाऊन लागल्याने माझे व्यवसाय पूर्णतः बंद पडले. मी एप्रिल व मे महिन्याचा फायनांन्स च्या किस्ता भरू शकलो नाही. सध्या माझ्या परिवाराचे उदारनिर्वाह करणे मला कठीण झाले आहे. त्यात कर्ज भराव कसा हा विचार आला आहे. शासनाने आम्हाला व्यवसाय सुरळीत होई पर्यंत शक्तीने कर्जाची भरणी करायला लावू नये.
भावेश बडघरे
व्यावसायिक
मी खासदार कृपालजी तुमाने यांच्याशी बोलने केले व खासदार यांनी पोलीस अधिक्षक यांना अश्या सक्तीच्या वसूली करणाऱ्यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
हिराचंद कडू
शिवसेना शहर प्रमुख मोवाड
Maharashtra News Media सच की आवाज