Breaking News

*आयडीबीआय बॅंक च्या मदतीने कन्हान नगरपरिषदेला सीएसआर निधीतुन कचरा कुंडी* *कन्हान-पिपरी शहरात विविध ठिकाणी लावण्याचा शुभारंभ*

*आयडीबीआय बॅंक च्या मदतीने कन्हान नगरपरिषदेला सीएसआर निधीतुन कचरा कुंडी*

 

*कन्हान-पिपरी शहरात विविध ठिकाणी लावण्याचा शुभारंभ*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – आयडीबीआय बॅंकेच्या सीएसआर निधी अंतर्गत प्राप्त कचरा कुंडी नगरपरिषद कन्हान-पिपरी शहरात विविध ठिकाणी लावण्याचा शुभारंभ करण्यात आला.
मंगळवार (दि.२५) मे ला आयडीबीआय बँकेच्या सीएसआर निधी अंतर्गत कन्हान – पिपरी नगरपरिषद कार्यालयात प्राप्त झालेल्या कचरा कुंडी कन्हान शहरात विविध ठिकाणी लावण्याचा लोकार्पण सोहळा कन्हान – पिपरी नगर परिषद व्दारे नगरपरिषद सामोर आयोजित करून नगराध्यक्षा मा. सौ. करुणाताई आष्टणकर यांचा हस्ते कचरा कुंडी लावुन शुभारंभ करण्यात आला असुन कन्हान शहरातील विविध ठिकाणी कचरा कुंडी लावण्यात येत आहे. या प्रसंगी नगरसेवक राजेश यादव, नगरसेवक राजेंन्द्र शेंदरे, नगरसेविका रेखा टोहणे, स्वच्छता अभियंता फिरोज बिसेन, लोकेश माहातो, जिवन ठवक्कर आदि प्रामुख्याने उपस्थित होते.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …