*विराट फार्म हाऊस वर पोलीसांची कारवाई*
*सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर यांची आकस्मिक कारवाई*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेरः दुसर्या चरणाच्या कोरोना विषाणूंचा वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मीळवीण्याकरिता केन्द्र व राज्य शासनाने लावलेल्या लाँकडाऊन मधे सावनेर पोलीस स्टेशन हद्दीतील फार्म हाऊस, हाँटेल ढाबे रात्रीच्या वेळीला अवैधरित्या सुरु व्यवसाय करून शासनाच्या दिशानिर्देशाचे उलंघन चोरी छुपे केल्या जात होते.काही दिवसापूर्वी दहेगाव फाट्यावर घडलेल्या अपघातातील आरोपीच्या बयानातुन सदर गोष्ट उघडकीस आल्याने पाटनसावंगी चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर यांनी आपल्या कर्तव्यदक्षतेचा परिचय देत अश्या अवैध व्यवसाय करणार्यांवर कारवाईचा सपाटा सुरु केल्याने अवैधरित्या हाँटेल-ढाबे व फार्म हाऊस संचालकांचे धाबे दणाणले आहे.
भन्साळी टाकळी शिवारातील बुधवारला रात्री ९ वाजताच्या विराट फार्म हाऊस येथील विनापरवंगी लग्न सोहळा सुरू असल्याचे कळताच पाटणसावंगी पोलिसांनी व ग्राम पंचायत भ. टाकली यांनी धाड टाकली सदर सदर फार्म हाऊस मधे लग्न सोहळा संपन्न होत असल्याचे तसेच शासनाच्या कोवीड़ 19 दिशानिर्देशाची पायमल्ली होत असुन जवळपास 300 लोकांच्या उपस्थितीत सदर आयोजन होत असल्याचे उघडकीस येताच फार्म हाउस संचालक अजय भगवानप्रसाद तिवारी यावर ग्रामपंचायत अधिनियम नुसार ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.

पाटनसावंगी पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर यांचे व्दारे वरच्यावर कारवाया होत असल्याने कोवीड़ 19 च्या दिशानिर्देशाची पायमल्ली करुण अवैधरित्या व्यवसाय करणार्यांचे धाबे दणाणले असुन सर्व स्तरावरून सदरहू कारवाईचे स्वागत केल्या जात असुन नियमबाह्य जाऊन व्यवसाय करणाऱ्यावर अश्याच कारवाया सातत्याने अपेक्षित असल्याचे जानकारांचे मत आहे.
Maharashtra News Media सच की आवाज