*चाचेर – निमखेडा येथे जिल्हा परिषद सदस्य कैलास बरबटे यांनी नागरिकांसाठी मोफत अॅंम्बुलंस ची केली सोय*

*”मानव सेवा हीच ईश्वर सेवा” या संकल्प ने तुन मोहिम सतत सुरु*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
ताससा ( चाचेर) :- चाचेर – निमखेडा जिल्हा परिषद सर्कल मधील तारसा प्राथमिक आरोग्य केंन्द्र , निमखेडा उपकेंन्द्र चाचेर येथील कोरोना महामारी वर मात करण्यासाठी व लसीकरण करण्यासाठी गावोगावी जाऊन बुजुर्ग व्यक्तींना , महिलांना , पुरुषांना लसीकरण घेण्यासाठी लसीकरण करण्याचे महत्वाचे मार्गदर्शन करुन त्यांना मोफत अॅंम्बुलंस ची सोय करुन त्यांना घेऊन नागरिकांना घरी पोहोचविण्यची मोहिम जिल्हा परिषद सदस्य कैलाश बरबटे यांच्या द्वारे सतत सुरु आहे .

मानव सेवा हीच ईश्वर सेवा असा बरबटे यांच्या संकल्प आहे . जिल्हा परिषद सदस्य कैलाश बरबटे यांनी नागरिकांन कडुन एक रुपया न घेता सतत सर्कल मधील त्यांचे काम सुरु आहे कैलाश बरबटे यांनी स्वताची अॅंम्बुलंस घेऊन जनतेची मदत केली व त्यांचा या कार्याला नागरिकांनी सुध्दा सलामी दिली आहे .
Maharashtra News Media सच की आवाज