Breaking News

*कांन्द्री ला अवैद्य दारू विकतांना एका महिलेला पकडले* *कन्हान पोलीसांची कारवाई दरम्यान भिगंरी देशी दारूच्या ५५ निप बाटल जप्त.*

*कांन्द्री ला अवैद्य दारू विकतांना एका महिलेला पकडले*

*कन्हान पोलीसांची कारवाई दरम्यान भिगंरी देशी दारूच्या ५५ निप बाटल जप्त.*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत कांन्द्री येथे अवैधरीत्या देशी दारू विक्री करतांना एका महिलेला पोलीसांनी पकडुन तिच्या ताब्यातील भिंगरी देशी दारूच्या निप जप्त करून अवैद्य दारू विक्रीचा गुन्हा दाखल करून ही कारवाई करण्यात आली आहे.
बुधवार (दि.२) ला रात्रि ९.३० वाजता दरम्यान कन्हान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती च्या आधारे ग्रामपंचायत
कांन्द्री शिवनगर झोपडपट्टी परिसरात धाड टाकली असता येथील रहिवासी पुष्पाबाई गौरिशंकर बेलपांडे वय ४० वर्ष, राहणार शिवनगर झोपडपट्टी कांन्द्री ही महिला अवैद्यरित्या भिंगरी देशी दारू विक्री करतांना मिळुन आल्याने कन्हान पोलीसांनी तिला पकडुन तिच्या ताब्यातील भिंगरी देशी दारू च्या ५५ निपा किंमत ४४०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी महिला पुष्पाबाई बेलपांडे च्या विरूध्द अवैद्य दारू विक्रीचा गुन्हा दाखल करून अटक केली व सुचना पत्र देऊन सोडण्यात आले. सदर कारवाई कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशन चे हवालदार अरूणकुमार सहारे, पोशि मंगेश सोनटक्के, निसार शेख, महिला पोलीस पुना भैसारे सह आदि पोलीस कर्मचार्यांनी ही कारवाई यशस्विरित्या पार पाडली.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …