Breaking News

*मुरमाडी येथील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे निकृष्ट बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करा – आमदार डॉक्टर देवरावजी होळी* *निकृष्ट बांधकामामुळे पहिल्या पावसातच आरोग्य उपकेंद्राचे स्लॅबला लागली गळती* *स्लॅबच्या गळतीमुळे मंत्री विजय भाऊ वडेट्टीवार महोदयांच्या हस्ते होणारे उदघाटन रद्द*

*मुरमाडी येथील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे निकृष्ट बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करा – आमदार डॉक्टर देवरावजी होळी*

*निकृष्ट बांधकामामुळे पहिल्या पावसातच आरोग्य उपकेंद्राचे स्लॅबला लागली गळती*

*स्लॅबच्या गळतीमुळे मंत्री विजय भाऊ वडेट्टीवार महोदयांच्या हस्ते होणारे उदघाटन रद्द*

गढ़चिरोली प्रतिनिधि – सूरज कुकुडकर

गडचिरोली- मुरमाडी येथील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे उदघाटन राज्याचे बहुजन विकास, मदत व पुनर्वसन मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते ठरले होते. परंतु निकृष्ट बांधकामामुळे पहिल्या पावसातच या बांधकामाचे स्लॅब गळायला लागला त्यामुळे स्थानिक जनतेने प्रचंड संताप व्यक्त केला. त्यामुळे अखेरच्या क्षणी या उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा रद्द करावा लागला, ही एक मोठी शोकांतिका असून या उपकेंद्राचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी शासनाला केली आहे*

*जिल्हा वार्षिक योजना सर्व सर्वसाधारण कार्यक्रमांतर्गत मौजा मुरमाडी तालुका जिल्हा गडचिरोली येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा राज्याचे बहुजन कल्याण, मदत व पुनर्वसन मंत्री ना. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार, आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचेसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नियोजित करण्यात आला. परंतु नुकत्याच आलेल्या पावसामुळे या उपकेंद्राच्या बांधकामाचे स्लॅब गळायला लागल्याने स्थानिक जनतेने या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमावर संताप व्यक्त केला.सदर बांधकामाची चौकशी करणू कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करावे अशी विनंती गावकऱ्यांनी आमदार डॉ देवरावजी होळी यांच्याकडे केली. सदर बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे असून कोविड सारख्या महामारीत आरोग्य यंत्रणा व बांधकाम मजबूत करण्याची आवश्यकता असताना असे निकृष्ट दर्जाचे बांधकाम योग्य नाही त्यामुळे सदर बांधकामाची चौकशी करून कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करावे, त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमदार डॉ देवरावजी होळी यांनी शासनाकडे केली आहे*

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …