Breaking News

*बॅरि.शेषराव वानखेडे महाविद्यालयात “शिव स्वराज्य दिन “साजरा*

*बॅरि.शेषराव वानखेडे महाविद्यालयात “शिव स्वराज्य दिन “साजरा*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी – दिलीप येवले
नागपुर:- बॅरि. शेषराव वानखेडे महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने शिव स्वराज्य दिनाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या आदेशानुसार महाविद्यालयात प्राचार्य डॉ. आर. जी टाले यांच्या अध्यक्षतेखाली व महाविद्यालयाच्या नॅक समन्वयक डॉ. संगीता चोरे यांच्या प्रमुख वक्ते म्हणून उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. प्रास्ताविकात बोलताना सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. प्रतिभा गडवे यांनी सांगितले की, शिवाजी महाराजांचा इतिहास हे भारतीय इतिहासातील मानाचे सुवर्ण पान होय. असीम कतृत्वाचे धनी असलेल्या राजेंचा आज राज्याभिषेक दिन त्या कतृत्वाला सलाम म्हणून आजचा दिवस साजरा होत आहे. प्रमुख वक्ते म्हणून बोलताना डॉ. संगीता चोरे यांनी सांगितले की, शिवाजी महाराज महाराष्ट्रासाठी नव्हे, तर आखील भारत वर्षासाठी प्रेरणादायक असलेले नेतृत्व होय. केवळ देशाच्या संरक्षणाच्या भावनेने पछाडलेल्या या योद्धयांने अफाट आत्मविश्वास व युक्तीने तुटपुंज्या लष्करी बळावर शत्रूवर विजय मिळवून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हा इतिहास आजही अंगावर रोमांच उभे करतो. अध्यक्ष म्हणून बोलताना प्राचार्य डॉ. आर. जी. टाले यांनी प्रतिपादन केले की, रयतेचे राज्य शाश्वत, चिरंतन रहावे म्हणून याच दिवशी दुर्ग रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला. हा दिवस स्वराज्याची, सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा हा शुभदिन आहे. स्वराज्याचे सार्वभौमत्व याच दिवशी राजगडावरून घोषित झाले. याच दिवसापासून शिवकालगणनेला प्रारंभ झाला. त्यामुळे आजचा दिवस “शिव स्वराज्य दिन साजरा करण्याचा शासन निर्णय निश्चित प्रशंसनीय आहे.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मराठी विभाग प्रमुख डॉ. अंजली पांडे यांनी केले. कोविड- च्या पार्श्वभूमी वर सामाजिक सुरक्षिततेचे सर्व नियम पाळुन महाविद्यालयात समस्त प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …