*उमंग गीताई कॉलेज ऑफ वुमेन्स एज्युकेशन नागपुर येथे शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
नागपुर :- उमंग गीताई कॉलेज ऑफ वूमेन्स एज्युकेशन नागपुर, कोराडी रोड, पांजरा येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागव्दारे 6 जून 2021 रोजी शिवस्वराज्य दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित महाविद्यालयाच्या संचालिका वैशाली फुले, प्राचार्य डॉ अतुल टेकाडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोस दीपप्रज्वलन व माल्यार्पण करून वंदन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांसाठी झूम ॲप द्वारे वेबिनार चे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या फॅशन अँन्ड अँपरेल डिझाईन विभागाच्या प्राध्यापिका रोशनी डहारे हे या वेबिनार साठी प्रमुख वक्त्या होत्या. वेबिनार मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी स्थापित केलेल्या स्वराज्य यावर दृष्टीक्षेप टाकण्यात आला. सुमारे 75 विद्यार्थींनी वेबिनार मध्ये भाग घेऊन शिवराज्य दिन बद्दल माहिती घेतली.
Maharashtra News Media सच की आवाज