*कोरोणा काळातील आरोग्य संवर्धन गरजेचे – वेखंडे*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
नागपुर :- बँरी शेषराव वानखेडे कला व वाणिज्य महाविद्यालय खापरखेडा येथील कार्यरत असलेल्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने कोरोना काळात आरोग्याचे संवर्धन या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर जी टाले अध्यक्ष म्हणून तर प्रमुख पाहुणे म्हणून दिनेश वेखंडे योगतज्ञ नागपुर होते. प्रमुख वक्ते दिनेश वेखंडे यांनी या काळात स्वतःच्या आरोग्य चे कशा प्रकारे संवर्धन करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. वैयक्तिक स्वच्छता, प्राणायाम, योगासने, आहार, दवाई आणि व्यक्ती याबाबत अनेक उदाहरणे देऊन समाजप्रबोधनातून सांगितले. योगासने, प्राणायाम प्रत्यक्ष त्यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले ते अत्यंत प्रभावी ठरेल पहिली आणि दुसरी करुणा लाट येऊन गेली असता तिसरी लाट कोरोणा ची पुन्हा येणार अशी परिस्थिती निर्माण होत आहे. म्हणून तज्ञांनी सांगितलेली नीती नियम पाळणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे ते शेवटी म्हणाले कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ टाले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात समर्जक असे मार्गदर्शन केले. वेखंडे यांनी सांगितलेल्या गोष्टीकडे लक्ष देऊन स्वतःच्या आरोग्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे उपकार्यकारी अधिकारी डाँ उमेश जनबंधू तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ राजेंद्र राऊत यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.
Maharashtra News Media सच की आवाज