Breaking News

*पहील्या पाण्याच्या टप्यात प्रभाग क्रमांक ०६ मध्ये रस्त्या वर स्विमिंग पूल तयार*

*पहील्या पाण्याच्या टप्यात प्रभाग क्रमांक ०६ मध्ये रस्त्या वर स्विमिंग पूल तयार*

हिंगणघाट प्रतिनीधी – भाऊराव कोटकर

हिंगणघाट – नुकताच सुरू झालेल्या पावसाळ्यातला पहील्या पाण्याच्या टप्यात प्रभाग क्रमांक ०६ मध्ये रस्त्या वर स्विमिंग पूल तयार झालेले आहेत. पावसाळा लागायच्या आधी ह्याची पूर्वसूचना विद्यमान नगरसेवकांना व प्रशासनास देऊन ही याची दखल घेतलेली नाही,त्यामुळे लोकांमध्ये नाराजगी व्यक्त होत आहे, वाहत येणारे गडर व इतर सांडपाणी लोकांच्या घरात शिरत आहे, त्यामुळे रोगराई चा मोठ्या प्रमाणात सामना स्थानीय लोकांना करावा लागत आहे.शासनाच्या स्वच्छ अभियानाचे धिंडोरे वाजत आहे, जनप्रतिनीधी, नगरपालिका अध्यक्ष,नगरसेवक स्वच्छ अभियानाचा जो गाजावाजा करित आहे,तो फक्त वर्तमान पत्रिकेत फोटो पुरताच आहे कां?

असा प्रश्न करीत एकता प्रतिष्ठान चे प्रमुख श्री अखील धाबर्डे व सहकारी करीत आहे?
कोरोना चे पेशेंट नियंत्रणात येत असताना नव्या रोगराई ला खुद प्रशासनाकडून दुजोरा देण्यात येत आहे कां?

स्थनिक नगरपालिकाचे प्रशासन जानुबुजुन तर करीत नाही ना ?

असा आरोप एकता प्रतिष्ठान प्रमुख अखिल धाबर्डे यांनी केला असून त्वरित अडचनी चा मार्ग काढा.अन्यथा न काढल्यास स्थानीय लोकांसोबत नगरसेवकांचा व नगर पालिका प्रशासना चा घेराव करण्यात येईल आणि प्रत्येक खड्ड्यात बेशरम चे वृक्षारोपन करुन त्या लोकांची नावे देण्यात येईल जे स्वतःच्या जवाबदारी पासुन पळ काढून सुस्त आहेत.
याची नगरपालिका प्रशासनानी त्वरीत दखल घ्यावी.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …