Breaking News

*क्षुल्लक कारणावरून गुंडांनी दोन युवकांना पोटात भोसकले चाकू*

*क्षुल्लक कारणावरून गुंडांनी दोन युवकांना पोटात भोसकले चाकू*

नागपुर प्रतिनिधि – पवन किरपाने

नागपूर : नागपुरातील गुंडगिरीचा कळस दाखवणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. माझ्याकडे रागाने का पाहतो एवढ्या क्षुल्लक कारणावरून गुंडांनी दोन युवकांना भोसकले धक्कादायक म्हणजे पोटात चाकू खुपसलेल्या अवस्थेत तरुण पोलीस स्टेशनला दाखल झाले. नागपूरच्या कपिल नगर पोलिस स्टेशन अंतर्गत माझ्याकडे रागाने का पाहतो एवढ्या क्षुल्लक कारणावरून म्हाडा कॉलनी परिसरातील काही गुंडांनी विनय राबा आणि कुणाल जयस्वाल या दोन्ही तरुणांवर जीवघेणा हल्ला केला.


बाबा ताजुद्दीन दर्गा जवळ रात्री झालेल्या या हल्ल्यात आरोपींनी विनय आणि कुणालला आमच्याकडे रागाने का पाहता एवढ्या कारणावरून त्यांच्या पोटात आणि पाठीवर धारदार चाकू भोसकले. या हल्ल्यात विनय आणि कुणाल गंभीर जखमी झाले. या हल्ल्यानंतर दोघेही त्यांच्या पोटात आणि पाठीत चाकू खुपसलेल्या आणि रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस स्टेशनला पोहोचले. त्यावेळचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना समोर आली.

पोलिसांनी या घटनेसंदर्भात म्हाडा कॉलनी परिसरातला गुंड सलमान शेख याच्यासह त्याच्या काही सहकाऱ्यांना अटक केली आहे. जखमी विनय आणि कुणाला रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …