Breaking News

*रेतीची अवैध वाहतुक ; प्रशासनाच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह* *पोलीस चौकी व तलाठी कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावरून सर्रास वाहतुक*

*रेतीची अवैध वाहतुक ; प्रशासनाच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह*

*पोलीस चौकी व तलाठी कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावरून सर्रास वाहतुक*

नरखेड तालुका प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे

नरखेड – तालुक्यामध्ये अवैध व ओहरलोड रेतीची वाहतुक वाढली आहे. या वाहतुकीमुळे डांबरी रोडची दैनावस्था होत आहे. या वाहतुकीबाबत महसुल व पोलीस विभागातील अधिकाऱ्यांना इत्थभूत माहीती आहे. मात्र कुणिही कार्यवाही करण्याची हिंम्मत करीत नसल्याने आश्चर्य केले जात आहे.

         नागपूर जिल्ह्यातील कोणत्याही नदीवरील रेतीघाटाचा लिल्लाव झाला नाही. मात्र सावनेर , कामठी , पारशिवनी व मौदा तालुक्यातील कन्हान नदीच्या पात्रातुन मोठ्याप्रमाणात रेतीचा अवैध उपसा सुरू आहे. बाजारात कन्हान नदीच्या तांबड्या रेतीला भरिव मागणी असल्याने ती रेती अलिकच्या काळात नरखेड मार्गे अमरावती जिल्हात मोठ्या प्रमाणात आणली जात आहे.

          ही रेती सावनेर तालुक्यातील खापा , सिल्लेवाडा या भागातुन येत आहे ही रेती चढ्या भावाने विकली जात आहे.ही रेती कुठून आणली जाते. रेती वाहतुकीचा मार्ग कोणता आहे. ती दिवसा व रात्री आणली जाते या बाबत नरखेड तालुक्यातील महसुल व पोलीस विभागातील अधिकाऱ्यांना इंत्थभूत माहीती आहे.या वाहतुकीवर कोणतीही कार्यवाही करित नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून ‘अर्थ ‘ पूर्ण संबधामुळे याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची माहीती सुत्रांनी दिली.

           किमान १०० -१५० टिप्पर रेतीची वाहतूक सावरगाव – नरखेड – मोवाड – वरुड व पांढूर्णा – मोवाड – वरूड या मार्गांनी दिवसाव रात्रीच्या वेळी १०० ते १५० टिप्पर रेतीची वाहतुक केली जाते. प्रत्येक टिप्पर ची परवानगी ४-६ ब्रास ची असतांना त्यात १५ ते १८ ब्रास रेती आणली जाते. या टिप्पर च्या किमान १५ ते ३० टन वजनामुळे मजबूत असलेल्या डांबर रस्ते पूर्णतः खराब झाले आहे. मोवाड शहराच्या पोलीस चौकी व तलाठी कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावरून सर्रास रेती वाहतुक सुरु आहे. या रस्तावर नागरिकांना ये -जा करायला त्रास सहण करावा लागत आहे.पण या त्रासाचे सोडा दोन्ही विभाग आपले खिशे गरम करण्यात व्यस्त आहे,यात लाखोंची उलाढाल होत असते,यावर कोणी आवाज उचलण्याचा जर प्रयत्न केला तर त्या आवाज उचलणाऱ्यावर उलट आरोप करून त्यांचे तोंड बंद केले जाते,टिप्पर/टॅक्टर वाल्यांची ठाण्यात मिलीभगत असते,रेती मद्धे येवढी कमाई असते की टायर पंचर च्या दुकान चालविणाऱ्या जवळ आज २/३ टिप्पर आहे, यावरून आपण अंदाज लावू शकता.वातावरण तापले की थातुरमातुर कारवाही केली जाते,पण त्यानंतर मात्र सर्रास रेतीतस्करची रेती चोरी सुरूच असते कारण सर्व सेटल असते..

प्रतिक्रिया 

रेतीची रॉयल्टी नसेल वा ती अवैध आढळल्यास कार्यवाही करू.
डी.जी.जाधव
तहसीलदार नरखेड

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …