*केंद्र सरकार च्या पेट्रोल-डीजल-गैस सिलिंडर च्या दरवाढ विरोधात कांग्रेसचे तीव्र आंदोलन*

*कांग्रेस च्या कार्य काळात भर रस्त्यावर विरोध करणारे आज सत्तेत असल्यावर गप्प का बसले ?*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – भारतात कोरोना चा प्रादुर्भाव पसरल्याने शासना द्वारे संचारबंदी लागु करुन लाॅकडाऊन लावण्यात आल्याने व्यापारांचे दुकाने व नागरिकांचे सर्व काम धंदे बंद पडल्याने आर्थिक परिस्थिति मंदावली असुन उपाशी पोटी राहण्याची वेळ आली आहे . अश्या या गंभीर परिस्थिती मध्ये केंन्द्र सरकार द्वारे पेट्रोल , डिजल गैस सिलेंडर चे भाव वाढविल्याने आम नागरिकांवर एक संकट उभे झाल्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी चे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार व नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटी अध्यक्ष राजेंद्र मुलक यांच्या आदेशानुसार सोमवार दिनांक ७ जुन रोजी कन्हान येथे पेट्रोल-डीजल-गैस सिलिंडर दरवाढ विरोधात चक्रधर पेट्रोल पंप कन्हान येथे राष्ट्रीय काॅंग्रेस कमेटी द्वारे तीव्र रोष दर्शवित आंदोलन करून दरवाढ कमी करण्याची मागणी करण्यात आली.
देशाच्या इतिहासात कधी पेट्रोल १०० रूपयाचा आंकड़ा पार नाही करू शकला पण ज्या सर्वसामान्य जनतेनी सत्ता मिळवुन दिली त्यांना विसरून अदानी-अंम्बानी सारख्या अरबोपतीचे खिशे भरणाऱ्या करिता हे सरकार दिवसेदिवस दरवाढ करून महागाई चा डोंगर उभा करून सर्वसामान्य जनतेला काय सिध्द करित आहे ? सर्वसामान्याना जिवन जगने कठीण करून मुठभर लोक यांना किती दिवस सत्तेत ठेवु शकतील. या सरकार च्या दरवाढ, महागाई ने नागरिक त्रस्त होऊन रसत्यावर उतरत असल्याचे चित्र दिसत असल्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार व नागपुर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटी अध्यक्ष राजेंद्र मुलक यांच्या सुचनेनुसार सोमवार दिनांक.७ जुन रोजी कन्हान येथे पेट्रोल-डीजल-गैस सिलिंडर दरवाढ विरोधात चक्रधर पेट्रोल पंप कन्हान येथे राष्ट्रीय काॅंग्रेस कमेटी द्वारे तीव्र रोष दर्शवित पेट्रोल पंप च्या मशीन ला हार माल्यार्पण करुन व बैलबंडी वर दुचाकी वाहन ठेवुन तारसा चौक पर्यंत मोर्चा काढुन भर चौकात केंन्द्र सरकार विरोधात जोरदार प्रदर्शन करुन दरवाढ कमी करण्याची मागणी करण्यात आली. या प्रसंगी नागपुर जिल्हा कांग्रेस कमेटी उपाध्यक्ष व इंटक नागपुर क्षेत्र अध्यक्ष नरेश बर्वे, देवचंद चकोले, प्रकाश बोंन्द्रे, महेश काकडे , रवि रंग, महिला काॅंग्रेस कन्हान अध्यक्षा रीता बर्वे, नगरसेवक बाबु रंगारी, मनीष भिवगड़े, विनय यादव, रेखा टोहने, पुष्पा कावडकर, इंटक संघटनचे पप्पूजी जामा, नदीम जामा, धनंजय सिंह, रंजीत सिंह, चाँद हुसैन, शकील अंसारी, शिवाजी सिंह, राजा यादव, प्रदीप बावने , आकिब सिद्दीकी, रामचंद्र कुशवाह, आनंद नायडू, अशोक प्रसाद, सतीश भसारकर, सतीश पाली, विजय तिवारी, रोहित बर्वे, राजन वियनवार, कुशल पोटभरे, शक्ति सिंह, साजिद जामा, अमर पात्रे, उमेश माहुरे, सोनू मसराम, प्रशांत मसार, अजय कापसीकर, पंकज गजभिये, महेश ढोंगड़े, सुमेध घोरपड़े, आकाश रहिले, रेखा उपासे, डोरटी जेम्स, डोरी मेरी, प्रिया राउत, पुष्पा भेलावे, रोशनी भेंढे व इतर काॅंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.
*काॅंग्रेस कमेटी कन्हान द्वारे चक्रधर पेट्रोल पंप येथे मोदी सरकार विरोधात प्रदर्शन*

कन्हान – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी अध्यक्ष मा.श्री नाना पटोले आणि नागपूर जिल्हा काँग्रेस कमेटी अध्यक्ष मा.श्री राजेंद्र मुळक यांच्या सुचनेनुसार काॅंग्रेस कमेटी कन्हान द्वारे चक्रधर पेट्रोल पंप येथे शहर अध्यक्ष राजेश यादव यांच्या नेतृत्वात काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी सरकार विरोधात नाम फलक हातात पकडुन मोदी सरकार विरोधात नारेबाजी करित पेट्रोल , डीजल , गैस सिलेंडर चे दरवाढ कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे . या प्रसंगी श्यामबाबू पिपलवा , प्रमोद बांते , अविनाश रायपुरे , सुधाकर शंभरकर सह आदि काॅंग्रेस पदाधिकारी उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज