Breaking News

*बॉयपास वर कन्हान-बोरडा क्रॉसींग चौक येथे दुचाकी पिकअप चा भिषण अपघात एकाचा मुत्यु , तर एक गंभीर जख्मी* *आरोपी फरार , कन्हान पोलीसांनी अज्ञात दोन आरोपी विरुद्ध केला गुन्हा दाखल*

*बॉयपास वर कन्हान-बोरडा क्रॉसींग चौक येथे दुचाकी पिकअप चा भिषण अपघात एकाचा मुत्यु , तर एक गंभीर जख्मी*

*आरोपी फरार , कन्हान पोलीसांनी अज्ञात दोन आरोपी विरुद्ध केला गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग चारपदरी बॉयपास रस्त्यावरील कन्हान- बोरडा क्रॉसींग चौक येथे मोटार सायकल ला अशोक लेलॅन्ड पिकअप वाहनाने मागुन जोरदार धडक मारल्याने दुचाकी चालक युवकाचा घटनास्थळीच मृत्यु झाला तर मागे सवार गंभीर जख्मी झाल्याने त्यास उपचार्थ दाखल करून कन्हान पोलीसांनी फरार अज्ञात दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे.
कन्हान पोलीसांन कडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार रविवार दिनांकदि.६ जुन ला सायंकाळच्या सुमारास मृतक निलेश मोहनकर हा आपल्या दुचाकी वाहना ने नागपुर कडुन नगरधन मार्गे आपल्या गावाला जात असतांना मागुन येणाऱ्या अशोक लेलॅन्ड पिकअप वाहन हे सुद्धा नागपुर कडुन नगरधन मार्गे रामटेक कडे जात असतांना नागपुर बॉयपास राष्ट्रीय माहामार्ग चारपदरी रस्त्या वरील कन्हान-बोरडा- नगरधन क्रॉसींग चौक येथे दुचाकी वाहन चालकाने आपले वाहन बोरडा गावाकडे जाणाऱ्या मार्गाकडे वळविले असतांना मागुन येणाऱ्या अशोक लेलॅन्ड पिकअप वाहन चालकाने आपले वाहन निष्काळजीने व वेगाने चालवुन दुचाकीला जोरदार धडक मारल्याने मोटार सायकल (दुचाकी) वाहन चालक निलेश रामदास मोहनकर वय २४ वर्ष राहणार काचुरवाही रामटेक याचा घटनास्थळीच मुत्यु झाला. तर मागे बसलेला प्रितम प्रकाश मोहनकर हा गंभीर जख्मी झाल्याने उपचारा करिता नागपुर रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात येत आहे. कन्हान पोलीसांनी फिर्यादी मंगेश रामदास मोहनकर मृतकाचा लहान भाऊ यांच्या तक्रारी वरुन फरार अज्ञात दोन आरोपी विरुद्ध भादंवि कलम ३०४ अ, ३३८,२७९, मोटार वाहन कायदा १८४ नुसार गुन्हा दाखल करुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पी एसआई जावेद शेख, पोशि मानवटकर, राहुल रंगारी, संजु भदोरिया करीत आहे.

दुसरी घटना 

*टेकाडी फाट्याजवळ ट्रक व कार मध्ये जोरदार टक्कर*

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी फाट्याजवळ ट्रक व कार मध्ये जोरदार टक्कर झाल्याची घटना समोर आली आहे .
सुत्रान कडुन प्राप्त झालेल्या माहिती नुसार रविवार दिनांक ०६ जुन ला रात्री ०९:३० ते १०:०० वाजता च्या सुमारास टेकाडी फाट्याजवळ ट्रक व कार मध्ये जोरदार टक्कर झाली आहे . या घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन स्थिति नियंत्रणात करुन पुढील तपास सुरू केला आहे . बातमी लिहल्या पर्यंत कन्हान पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला नाही .

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …