*कन्हान व चाचेर येथे शिवराज्याभिषेक दिवस थाटात साजरा*

*विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – ०६ जुन २०२१ रोजी शिवराज्याभिषेक दिना निमित्य कन्हान व चाचेर येथे कार्यक्रमाचे आयोजन करुन छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता जिजाऊ माता यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत शिवराज्याभिषेक दिवस थाटात साजरा करण्यात आला .
*शिवाजी नगर मित्र परिवार , कन्हान*
कन्हान – शिवाजी नगर मित्र परिवार द्वारे शिवराज्याभिषेक दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी नगर येथे करुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता परिसरात वृक्षारोपण करून शिवराज्याभिषेक दिवस थाटात साजरा करण्यात आला . या प्रसंगी कार्यक्रमात मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते
*कन्हान शहर विकास मंच , कन्हान*
कन्हान – कन्हान शहर विकास मंच द्वारे शिवराज्याभिषेक दिना निमित्य कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी नगर येथे करण्यात आले असुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला जेष्ठ नागरिक भरत सावळे यांच्या हस्ते पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता मंच सचिव प्रदीप बावने यांनी शिवराज्याभिषेक दिना निमित्य मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत शिवराज्याभिषेक दिवस थाटात साजरा करण्यात आला .
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच उपाध्यक्ष रुषभ बावनकर , सचिव प्रदीप बावने , महासचिव संजय रंगारी , कोषाध्यक्ष हरीओम प्रकाश नारायण , प्रवीण माने , सुषमा मस्के , वैशाली खंडार सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .
*ग्रामपंचायत चाचेर , चाचेर*
चाचेर – ग्रामपंचायत चाचेर येथे शिवराज्याभिषेक दिना निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन शिवषक राजदंड स्वराज्यगुडी ची पूजा करून गुडी उभारण्यात आली असुन छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता जिजाऊ माता यांच्या प्रतिमेला मा.सरपंच महेश कलारे व जिल्हा परिषद सदस्य कैलास बरबटे यांच्या हस्ते पुष्प हार माल्यार्पण करुन पुजन करण्यात आले . त्या नंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर करुन शिवराज्याभिषेक दिवस थाटात साजरा करण्यात आला .या कार्यक्रमाला सदस्य कृष्णाजी खडसे, विठोबा ठोसरे , प्रकाश काळे , तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व माजी ग्रामपंचायत कर्मचारी श्री प्रभाकर खडसे , रत्नाकर बरबटे , शंकर झलके , आरोग्य सेविका इंदूताई मनगटे , अंगणवाडी सेविका पुष्पाताई बिसने, ग्रामपंचायत कर्मचारी चंद्रशेखर देवगडे , उत्तम पाटील ,रामानंद खडसे ,गुणरत्न हुमणे,प्रीती बावनकुळे आदि नागरिक उपस्थित होते .
*ग्रामपंचायत टेकाडी , कन्हान*
टेकाडी ग्रामपंचायत येथे शिवराज्याभिषेक दिना निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन सरपंच सुनीता प्रथ्वीराज मेश्राम यांच्या हस्ते शिव छत्रपति शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन भगवा शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य अरुण सुर्यवशीं , सुरेखा काबळे, सीधूं सातपैसे, मायाबाई मनगटे,मिना झोड , दिनेश चिमोटे, ग्राम विकास अधिकारी रानाडे साहेब , ग्राम पंचायत कर्मचारी सुनीता वानखेडे , मनोज मोहाडे,विलाश सावरकर, सुधाकर वासाडे, कृष्ण भाऊ,कृंदन शेंड,बाडू नाईक,सगंणक परिचालक सचीन हुड,व नागरिक उपस्थित होते.
*काॅंग्रेस पार्टी कन्हान शहर*
शिवराज्याभिषेक दिवस निमित्य कन्हान काॅंग्रेस पार्टी द्वारे कार्यक्रमाचे आयोजन करुन काॅंग्रेस पार्टी जिल्हा नागपुर ग्रामीण चे उपाध्यक्ष श्री नरेश बर्वे व महिला काँग्रेस अध्यक्ष सौ. रिताताई बर्वे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता नरेश बर्वे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व काॅंग्रेस पार्टी च्या पदाधिकार्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन केले . या प्रसंगी योगेश रंगारी,अमोल प्रसाद , सतीश भसारकर, रोहित बर्वे, शरद वाटकर,गौतम नितनवरे, दिनेश नारनवरे, सुमित घोरपडे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज