*ग्राम संवाद सरपंच संघ पारशिवनी तालुका अध्यक्ष पद्दी सौ सिमाताई उकुंडे*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य च्या पारशिवनी तालुका अध्यक्ष पद्दी ग्राम पंचायत साटक च्या सरपंचा सौ सिमाताई उकुंडे यांची नियुक्ती प्रदेश अध्यक्ष मा. अजिनाथ धामणे यांनी जिल्हा अध्यक्ष मा.नामदेव ठाकरे यांच्या सहमतीने करण्यात आली आहे.
ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य द्वारे ग्राम पंचायतीच्या सर्वागीण विकासाकरिता संघटना कार्य करित असुन सरपंच, उपसरपंच व सदस्याना त्यांचे अधिकार व कर्तव्याची जाणीव करून देऊन शासनाच्या विविध योजना गावातील प्रत्येक घटका पर्यंत पोहोचवण्याच्या मुख्य हेतु व उद्देशाने प्रदेश अध्यक्ष मा.अजिनाथ धामणे यांनी जिल्हा अध्यक्ष मा. नामदेव ठाकरे यांच्या सहमतीने पारशिवनी तालुका अध्यक्ष पद्दी ग्राम पंचायत साटकच्या सरपंचा सौ सिमाताई यशवंतराव उकुंडे यांची नियुक्ती केली आहे. ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष मा.अजिनाथ धामणे, उपाध्यक्ष प्रमोद भगत, सचिव विशाल लांडगे, विदर्भ विभाग प्रमुख दिगांबर धानोरकर, मिलन रामतेक्कर, कु. सविताताई आहाके, जिल्हा अध्यक्ष नामदेव ठाकरे यांचे नियुक्तीबद्दल सरपंचा सौ सिमाताई उकुंडे यांनी आभार व्यकत केले. पारशिवनी तालुक्यातील ग्राम पंचायत बोरडा सरपंच मनोहरराव डडुरे, डुमरी कला सरपंच रामेश्वर राऊत, बनपुरी सरपंच संजय गजभिये, निमखेडा सरपंचा कलावती तडस, उपसरपंच देवाजी डोंगरे, वराडा सरपंचा विद्याताई चिखले, साटक उपसरपंच गजानन वांढरे, राजेश ठाकरे, रविंद्र गुडधे, तरूण बर्वे, दिपक मोहनकर, सुभाष बिरो सह आदि ने तालुकाध्यक्ष पद्दी सौ सिमाताई उकुंडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
Maharashtra News Media सच की आवाज