*जागतिक पर्यावरण दिवसी विविध ठिकाणी केले वृक्षारोपण*

*कन्हान शहर विकास मंच , भाजपा कामठी शहर , चाचेर ग्रामपंचायत द्वारे जागतिक पर्यावरण दिवस थाटात साजरा*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – देशात विविध ठिकाणी विविध बांधकामाच्या निर्माण कामाकरिता मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड होत आहे . त्यामुळे देशात आॅक्सीजन चे प्रमाण कमी झाले आहे . त्यामुळे किती तरी कोरोना रुग्णांचा मृत्यु झाला आहे . हे लक्षात घेऊन कन्हान , कामठी , चाचेर , व जुनी कामठी येथे ५ जुन जागतिक पर्यावरण दिवस निमित्य नैसर्गिक आॅक्सीजन मिळण्याकरिता वृक्ष लावण्यात आले .
*कन्हान शहर विकास मंच*
कन्हान : – कन्हान शहरात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असुन या लाटेत ऑक्सीजन ची कमतरता भासुन शहरातील कितीतरी लोकांचा मृत्यु झाल्याने नागरिकांत मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने कन्हान शहर विकास मंच द्वारे गांधी चौक कन्हान येथे आंब्याचे तर प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथे पिंपळाचे वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला .
देशात, राज्यात, जिल्ह्यात, शहरात कोरोना ची दुसरी लाट आटोक्यात येत असुन या दुसरी लाटेत ऑक्सीजनची कमतरता भासुन शहरातील कितीतरी लोकांचा मृत्यु झाल्याने नागरिकांच्या हितार्थ कोरोना विषाणुची साखळी तोडण्याकरिता आणि पर्यावरणा चा समतोल राखुन नैसर्गिक ऑक्सीजन मिळण्याकरिता कन्हान शहर विकास मंच द्वारे शनिवार (दि.५ ) जुन ला जागतिक पर्यावरण दिवसाचे औचित्य साधुन गांधी चौक कन्हान येथे पोलीस निरीक्षक अरूण त्रिपाठी यांचा हस्ते आंब्याचे वृक्षारोपण तर प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथे डॉ रोहित आचारे व प्रल्हाद कुंभरे यांच्या हस्ते पिंपळाचे वृक्ष चे वृक्षारोपण करून जनहितार्थ कार्याने जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचिव प्रदीप बावने, कोषाध्यक्ष हरीओम प्रकाश नारायण, शाहरुख खान, प्रविण माने, सुषमा मस्के, वैशाली खंडार सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते.
*ग्रामोत्थान बहुद्देशीय संस्था टेकाडी व नेहरू युवा केंद्र*
कन्हान : – विश्व पर्यावरण दिवसा निमित्य संकल्प ग्रामोत्थान बहुद्देशीय संस्था टेकाडी संलग्न नेहरू युवा केंद्र नागपुर द्वारे न्यु वसाहत टेकाडी येथील वाचनालय परिसरात वृक्षरोपन करून विश्व पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे सचिव अरविंद सिंह यांनी युवकांना पर्यावरणा चे महत्व स्पष्ट करित पर्यावरण असंतुलित होऊन वातावरण दूषित आणि अनेक महामारीचा सामना करावा लागत आहे. यावेळी युवकांनी पर्यावरणाच्या संरक्षणा करिता लोकांत जनजागरूता करण्याचा संकल्प घेतला. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता प्रमोद खोरे, विदेश भोवते, आशूतोष कुमार, वैभव सिंह, शुभम कुंभलकर, प्रियांशु सिंग, आविष्कार रथकंठे, आयुश यादव आदी उपस्थित राहुन परिश्रम घेतले.
*भाजपा कामठी शहर , कामठी*
कामठी – भाजपा कामठी शहर द्वारे ५ जुन जागतिक पर्यावरण दिवस निमित्य हिंदु स्मशान भुमि आजनी रोड कामठी च्या ग्राऊंन्ड येथे वृक्षारोपण करुन जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला .या प्रसंगी भाजपा शहर कार्याध्यक्ष लालाजी खंडेलवाल महामंत्री राज हडोती , उज्वल रायबोले , लालसिंग यादव , विपक्ष नेता नगर परिषद कामठी नगरसेवक प्रतिक पडोळे , ग्रिनर संस्थे चे सचिन नायडु , हिंदू स्मशान भूमी के पदाधिकारी हरीशँकर गुप्ता , ऍड गोपाल शर्मा , मुकेश चकोले , सुधीर अपाले ,अजय पाचोली , सतिश जैस्वाल , प्रमोद वर्णम सह आदि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते .
*चाचेर ग्रामपंचायत , चाचेर*
चाचेर – चाचेर ग्रामपंचायत द्वारे ५ जुन विश्व पर्यावरण दिवस निमित्य स्मशान भुमि परिसरात जिल्हा परिषद सदस्य कैलास बरबटे व सरपंच महेश कलारे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले . या प्रसंगी समाज कल्याण विभागाचे पदाधिकारी मा.ओमप्रकाश डोले , मा.दुर्योधन बघमारे , तंटामुक्ती समिती चे अध्यक्ष श्री प्रकाश काळे , चाचेर ग्रामपंचायत चे कर्मचारी चंद्रशेखर देवगडे , रामानंद खडसे , गुणरत्न हुमणे , अश्विन वानखेडे , शिवचरण बावनकुळे , गजानन सतिकोसरे सह आदि नागरिक उपस्थित होते.
*जुनी कामठी , कन्हान*
कन्हान – जुनी कामठी येथे ५ जुन जागतिक पर्यावरण दिवस निमित्य वाचनालय व जिम च्या परिसरात वृक्षारोपण करून ग्राम पंचायत ला भेट देऊन सरपंच, सदस्य,गावकरी व सचिव यांच्याशी संवाद साधला. या प्रसंगी नागरिक उपस्थित होते
Maharashtra News Media सच की आवाज