*युवा बजरंग ग्रुप केरोडा द्वारा रक्तदान शिबिर आयोजित*
विशेष प्रतिनिधि
गढ़चिरोली – स्वयं रक्तदाता गडचिरोली जिल्हा समिती यांच्या सहकार्याने आज केरोडा गावात युवा बजरंग दल च्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले. सदर रक्तदान शिबिर जिल्हा परिषद शाळा केरोडा या ठिकाणी आयोजित केलेले होते. आपण गडचिरोली रक्तपेठी पर्यंत जाऊन रक्तदान करू शकत नाही. पण या दरम्यान जर आपल्या कुटुंबातील व्यक्तींना रक्त लागल्यास उपलब्ध होईल या उद्देशाने रक्तदान करावे हा उद्देश ठेवून आणि गावातील तरुण मुलांना प्रोत्साहित करून रक्तदान शिबिर यशस्वी करून दाखविले. आज झालेल्या रक्तदान शिबिरात एकूण 22 तरुणांनी रक्तदान केले. यामध्ये बजरंग दल चे सभासदांनी तसेच इतर मित्रमंडळींनी रक्तदान केले. या शिबिराचे आयोजन यशस्वी करण्यासाठी स्वय रक्तदान समिती गडचिरोली ने सुध्या खूप मोलाचे सहकार्य केले. अशाचप्रकारे जर का रक्तदान शिबिरांचे आयोजन गाव खेड्यावर होत राहिले तर कधीच कुणाला रक्ताची उणीव भासणार नाही. आज रक्तदान शिबिर यशस्वी करून युवा बजरंग दलाच्या सभासदांनी एक अनोखा आदर्श समाजासमोर घालून दिलेला आहे. आता गावातील तरुण मूल सुध्या रक्तदान करण्यासाठी मोठ्या हिरीरीने समोर येऊ लागले आहेत.
Maharashtra News Media सच की आवाज