*कन्हान पोलीसांनी हरविलेल्या दोघांचा शोध लावुन नातेवाईकांच्या स्वाधिन केले*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन ला मिसींग असलेल्या सत्रापुर येथील रोशनी शेंडे तसेच सतिष सोंभरे या दोघांना अथक परिश्रमाने शोध करित हिंगणघाट येथे मिळाल्याने कन्हान पोलीस स्टेशन येथे आणुन पोलीसांना त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधिन करण्यात यश आले.
कन्हान पोलीस स्टेशन ला मिसींग क्रमांक १७/२१ मधिल हरविलेली मुलगी रोशनी लखन शेंडे वय ३० वर्ष राहणार. सत्रापुर तसेच मिसींग क्रमांक २०/२१ मधिल सतिश क्रिष्णा सोंभरे वय २० वर्ष हे दोघेही घरी कुणालाही न सांगता निघुन गेल्याने त्यांच्या नातेवाईकांनी शोध घेऊन मिळुन न आल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला हरविल्याची तक्रार दाखल केल्याने कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस हवालदार अरूणकुमार सहारे यांनी दिवस रात्र अथक परिश्रमाने शो़ध करित हिंगणघाट पोलीस स्टेशन ला मिळुन आल्याने दोघांना ही कन्हान पोलीस स्टेशन ला आणुन दो़घांच्या नातेवाईकांना बोलावुन त्यांच्या ताब्यात देण्यात आल्याने नातेवाईकांनी कन्हान पोलीसांचे आभार व्यकत केले. सदर शो़ध कारवाई कन्हान पोलीस निरिक्षक अरूण त्रिपाठी यांचा मार्गदर्शनात पोलीस हवालदार अरूणकुमार सहारे, पोशि मंगेश सोनटक्के व महिला शिपाई दिपमाला मोहड यांनी यशस्विरित्या पार पाडली.
Maharashtra News Media सच की आवाज