Breaking News

*टेकाडी ग्रामपंचायत येथे कोरोना ची तिसरी लाट व म्युकरमायकोसिस विषयी जनजागृती*

*टेकाडी ग्रामपंचायत येथे कोरोना ची तिसरी लाट व म्युकरमायकोसिस विषयी जनजागृती*

 

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – टेकाडी ग्रामपंचायत येथे कोव्हिड – १९ ची येणारी तिसरी लाट व लहान मुलावर होणारे परिणाम तसेच कोरोना आजारातुन बरे झालेल्या रूग्णाला म्युकरमायकोसिस आजारापासुन संरक्षण कसे करायचे आदी महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन करून चित्रफिती दाखवुन जनजागृती करण्यात आली.


टेकाडी ग्रामपंचायत येथे मंगळवार दिनांक.८ जुन ला कोव्हिड – १९ व म्युकरमायकोसिस या आजारा वर जनजागृती कार्यक्रम ग्रामपंचायत च्या सरपंचा सुनिता मेश्राम , ग्राम विकास अधिकारी हरिदास रानडे, पंचायत समिति अधिकारी व ग्रामपंचायत सदस्य यांचा प्रमुख उपस्थिति मध्ये आयोजन करून कोरोना ची येणारी तिसरी लाट आणि लहान मुलांवर होणारे परिणाम तसेच कोरोना आजारापासुन बरे झालेल्या रुग्णाला होणारा म्युकरमायकोसिस आजारा पासुन संरक्षण कसे करायचे, हा आजार झाल्यास घ्यावयाची काळजी आदी महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. आणि भिंतीवर चित्रफीत दाखुवन सविस्तर माहीती देऊन जनजागृती करण्यात आली. या प्रसंगी टेकाडी ग्राम पंचायत च्या सरपंचा सुनीता मेश्राम, पंचायत समिती अधिकारी योगीराज भोगे, ग्राम विकास अधिकारी हरिदास रानडे, ग्राम पंचायत सदस्या सिंधुताई सातपैसे, माया मनघटे, सुरेखा कांबळे, सदस्य अरुण सुर्यवंशी, पंचायत सेवक मनोज मोहाडे, विलास सावरकर, सुनीता वानखेडे, अंगणवाडी सेविका, आशा वर्कस, कृषी सहाय्यक व ग्राम स्तरावरील कर्मचारी सह आदि नागरिक उपस्थित होते.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …