*तेजस संस्था द्वारे पारशिवनी तहसीलच्या जुनिकामठी च्या गरजु अपंगला अन्नदान*
*तेजस बहुउद्देशीय संस्था कामठी चा सेवाभावी कौतुकास्पद उपक्रम*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – तेजस बहुउद्देशीय संस्था कामठी द्वारे परिसरातील दात्या कडुन गहु, तांदुळ गोळा करून अंपग, गरिब, निराधार गरजु लोकांना अन्नधान्य दान या उपक्रमा अंतर्गत पारशिवनी तहसील च्या जुनिकामठी येथील अंत्यत गरजु , अपंग , लोकांना गहु, तांदुळाचे अन्न धान्य दान करण्यात आले.
डिसेंबर २०२० ला कामठी येथे दोन सग्या बहिनी चा भुकेने व्याकुळ होऊन घरीच मुत्यु झाला होता. अशी दुर्दैवी घटना भविष्यात कधी घडु नये करिता दखल घेत तेजस बहुउद्देशिय संस्था कामठी द्वारे दानदात्या संस्थाचे वरिष्ठ मार्गदर्शक महेन्द्र जी भुटानी, नवीन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय मलाचे, वरिष्ठ मार्गदर्शक सुनील चोखारे, सहयोगी सी ए शिल्पी टिडवाल, बबलु तिवारी, राजु अग्रवाल, अशोक धबोड़कर, निर्मल दवानी, मनोज बत्रा, विजय कोंडुलवार, सागर मदनकर, संदीप यादव , अजय आकरिया, शुधोधन पाटिल, प्रमोद टेंबुरनिकर , प्रविण शर्मा बुट्टीबोरी, रहीम शेख, चंद्रशेखर अरगुलेवार कडुन गहु, तांदुळ गोळा करून अंपग, गरिब, निरा धार गरजु लोकांना अन्नधान्य दान करण्याचा “भुकेल्यास एक मुठ अन्न आपले ” या उपक्रमाचा साई मंदीर कामठी-कन्हान येथे दिनांक.२६ जानेवारी २०२१ ला सुरू करून फेब्रुवारी पासुन दर महिन्याच्या ३ तारखेनंतर गरजु कडे जावुन अन्नधान्य दान करणे नियमित सुरू आहे. यांच उपक्रमांतर्गत दिनांक. ४, ५, ६, व ७ जुन २०२१ ला कामठी च्या अंपग, गरिब, निराधार गरजु लोकांना अन्नधान्य दान करण्यात आले. बुधवार दिनांक.९ ला जुनी कामठी येथे तेजस बहुउद्देशीय संस्थे चे अध्यक्ष चंद्रशेखर अरगुलेवार, उपाध्यक्ष देवीदास पेटारे, सदस्य मिस्बाहऊर रहमान आदीच्या उपस्थितीत निराधार, गरीब गरजुंना गहु व तांदुळाचे अन्नधान्य दान करण्यात आले. तसेच सत्रापुर येथील गरजुंना सुध्दा तेजस संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा हस्ते १०-१० किलो गहु, तांदुळाचे अन्न धान्य वितरण करण्यात आले. तेजस संस्थेच्या ” भुकेल्यास एक मुठ अन्न आपले “या अंपग, गरजु नागरिकांना दर महिन्याला वितरण करित तेजस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर अरगुलेवार यांचे सेवाभावी हाथ सदैव मानवते करिता प्रर्यंत्नशिल आहे.
Maharashtra News Media सच की आवाज