Breaking News

*कन्हान पोलीस निरीक्षक यांचा वाढदिवस केला थाटात साजरा* *सामाजिक कार्यकर्त्यांनी पुर्व राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची प्रतिमा दिली भेट*

*कन्हान पोलीस निरीक्षक यांचा वाढदिवस केला थाटात साजरा*

*सामाजिक कार्यकर्त्यांनी पुर्व राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची प्रतिमा दिली भेट*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मा.श्री अरुण त्रिपाठी यांचा वाढदिवसी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुर्व राष्ट्रपती स्वर्ग.श्री प्रणब मुखर्जी यांची प्रतिमा भेट देऊन वाढदिवस थाटात साजरा केला.


बुधवार दिनांक.९ जुन २०२१ ला कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मा.श्री अरुण त्रिपाठी यांचा वाढदिवसा निमित्य कन्हान शहराच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी सायंकाळच्या सुमारास कन्हान पोलीस स्टेशन येथे जाऊन पोलीस निरीक्षक मा.श्री अरुण त्रिपाठी यांचाशी भेट घेऊन वाढदिवसा निमित्य त्यांना देशाचे पुर्व राष्ट्रपती स्वर्ग.श्री प्रणब मुखर्जी यांची प्रतिमा भेट देऊन व पुष्प गुच्छ देऊन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ता व युवा पत्रकार ॠषभ बावनकर, प्रशांत मसार, चंदन मेश्राम, रंजनिश मेश्राम, अक्षय फुले सह आदि नागरिक उपस्थित होते.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …