*माध्यमापासुन दुर निष्काम कर्मयोगी कमलदाद वाढवे महाराज अनंतात*
*त्यांच्या जानेणे स्वप्न राहिले अपुरे*
नरखेड तालुका प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे
मोवाड – येथील अखिल भारतीय श्री. गुरूदेव सेवा मंडळ वर्धाकुंज मोझरी अंतर्गत मोवाड
येथील नागपूर जिल्हा प्रचारक तथा ग्रामगीता
प्रवचनकार ह.भ.प. कमलदास बापूराव वाढवे
महाराज ( वय ६८) हे वाई (खुर्द), जिल्हा अमरावती येथे अरण्यात वसलेल्या मारूती
मंदीरात दि. ६ एप्रीलला अनंतात विलीन झाले.
त्यांच्या पार्थीवावर तेथेच अंत्यसंस्कार कलण्यात आले. मात्र दोन महीण्यापासुन त्यांच्या मृत्युची बातमी कुणालाच कळली नाही
हे विशेष. थोडक्यात म्हणजे वाढवे महाराजांनी
लहाणपनापासुनच आपले संपुर्ण जिवन राष्र्टसंताच्या ग्रामगीता प्रणीत विचारावर खर्ची
घातले होते. नागपूरच नव्हे तर छिंदवाडा, अमरावती, अकोला, चंद्रपूर या जिल्ह्यातही
त्यांनी गावोगावी वं. राष्र्टसंत तुकडोजी महाराजांचे विचार पेरून जनजागृती केली.
ग्रामगीतेचे वाचन व अखंड ग्रामगीता पारायणातुन त्यांनी अनेक गावात सामुदायीक
प्रार्थना मंदीराच्या बांधकामाचा पाया रचला.
सामुदायीक प्रार्थना मंदीरे बांधण्यासाठी त्यांनी
सर्वधर्म समभावातुन जनतेला जागृत केले.
मरणाच्या दहा दिवसाअगोदर वाई
(खुर्द) या गावापासुन चार कीमी अंतरावरील
घनदाट जंगलात असलेल्या हनुमान मंदीर परीसरात सामुदायीक प्रार्थना मंदीर बांधकामासाठी त्यांनी आपले ठाण मांडले होते.
मात्र अचानक आलेल्या केवळ एक दिवसाच्या
तापाने त्यांनी मृत्युला कवटाळले. गुरूदेव सेवकांना दवाखान्यात नेण्यासाठी त्यांनी वेळही
दीला नाही. कोरोना लाॅकडाऊनमुळे सर्वत्र भीतीचेच वातावरण असतांना त्यांच्या मृत्युची
बातमीही कुणालाच कळली नव्हती. राज्यात
जिकडे तिकडे मृत्युचेच थैमान माजले होते.
त्यामुळे वाढवे महाराज हे प्रसारण माध्यमापासुन दुरच राहीले.
Maharashtra News Media सच की आवाज