“महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त आयोजनात दांडी यात्रा व सिंधुताई सपकाळ(माई) लाा पाहणी साठी उसळली गर्दी”


*समाजसेवेचा मार्ग काटेरी,चिखल,गोट्यांनी माखलेला व खड़तड…*


*जग समाज सेवकाला माथेफीरू,वेडा़,पागल,वाया गेलेला समझतो परंतू जेव्हा तो शिखर गाठतो तेव्हा अख्ख जग त्याल्या लोटांगन घालुन डोक्यावर घेतो…*

*सिंधूताई सपकाळ*
*मुख्य संपादक -किशोर ढुंढेले*

*सावनेर-महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त आयोजित दांडी यात्रेत हजारोंच्या उपस्थितीत राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पन करुण सदर दांडी यात्रेचे प्रसंग लाँन येथे मान्यवरांचे मार्गदर्शन व अनाथांची माई सिंधूताई सपकाळ यांच्या मार्मीक प्रबोधनानी समापन करण्यात आले.*

*नगरीतील समाजसेवी गोपाल घटे व सौ वैशाली घटे यांच्या पुढाकारणे सदर दिंडी यात्रेचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमात आकर्षणाचे केन्द्रबिंदू म्हणजे हजारो अनाथांची आई जेष्ठ समाजसेवीका सिंधूताई सपकाळ यांनी आपल्या प्रबोधनातून म्हटले की समाजसेवेचा मार्ग खुप खडतर व काटेरी तर असतोच सोबतच तो चिखलाने माखलेला असल्यामुळे घसरुण पडण्याची तर भीती असतेच सोबत आंगावर व कपड्यांनवर चिखल मातीचे डाग लागणे अपेक्षित असते म्हणून अश्या मार्गावर चालतांना खुप जपून चालांव लागतं व जो समाजकार्यात हे सगळं जपतो तोच खरा समाजसेवक असे मार्मिक कींतू कणखर मत व्यक्त करित म्हणाल्या की समाज सेवा करतांना आपल्या ईच्छा व आकांशांवर सय्यम तसेच काळजावर मोठा दगड़ ठेवावा लागतो समाजसेवेचा मार्ग वाटतो तीतका सोपा नाही तर प्रत्येक क्षणाला सजक राहुन आधी स्वताला जपावं लागतं.या मार्गात अडी अडचणी खुप येतात माझ्यावर ही आल्यात परंतू मी खचली नाही माझे एकच लक्ष होते ते म्हणजे दिनदुबळ्यांची सेवा ,अनाथांना मायेची उब व त्यांना समाजाच्या मुख्य धारेत आपल्या पायावर उभे करणे सुरुवातीला अडचणी खुप आल्यात पण अडचणीत खचेल ती आई कशी…*

*म्हणून आज एक दोन नाही तर हजारो हजार मुला मुलींची आई होण्याचा मान व आपल्या सामोर येण्याचा मान मला मिळाला व आपल्या सारखे प्रेम करणारे मुलं माझ्या पदरात आहे तर मला अजून काय पाहिजे.आज समाजसेवेचे चित्रच बदलेले आहे परंतू या बदलत्या परिवेशातही गोपाल घटे व सुनबाई सारखे लोक कल्याणाचा विचार करणारे तरुण युवक युवती पुढे येत आहे ही त्याच्या आई वडिलांनी दीलेल्या संस्काराची प्रचीती होय.तसेच संपूर्ण समाज जाग्रुत करण्याकरिता महिलांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.शिक्षण घेणे,घर सांभाळून दोन चार तास समाजाला द्या तर बधता बघता एक मोठे परिवर्तन दीसुन येईल असे मत आपल्या प्रबोधनातून व्यक्त करत उपस्थित जनसमुदाय व सावनेर वासीयांचे आभार मानले.*

*माई सिंधूताईची प्रकु्ती मागील काही दिवसा पासून बरी नसुन त्यांच्यावर पुणे येथील ग्लोबल हाँस्पीटल येथे तीन दीवसा पासून उपचार सुरु होता डाँक्टरांनी त्यांना प्रवास करण्याची परवानगी नाकारली होती तरी आई आपल्या सावनेरकर लेकांना भेट व आशीर्वाद देण्याकरिता पोहचल्याबद्दल संपूर्ण सावनेर करांनी माईचे आभार मानून त्यांनी दाखविलेल्या मार्गाचे अनुकरण करण्याची तयारी दर्शवली हे विशेष…*

*याप्रसंगी क्षेत्राचे आमदार सुनीलबाबू केदार,समाजसेवी योगेश कुंभलकर,डॉ. भगत,डॉ. विजय घटे,गोपाल घटे,वैशाली घटे सह हजारो च्या उपस्थितीत होते.


सामाजीक सेवेत स्वताला वाहुन घेणारे समाजसेवी,पत्रकार बांधव,सोशल मीडिया प्रतीनीधी आदींचे माईच्या हस्ते मानचिन्ह देऊण संन्मानित करण्यात आले तर गोपाल घटे व वैशाली घटे यांनी माईच्या सेवाकार्यात आपले अंशदान म्हणून एक लक्ष रुपयाचा धनादेश याप्रसंगी माईला देऊण खरा समाजसेवी होण्याचा परिचय दीला…*
Maharashtra News Media सच की आवाज