*राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषदेच्या कार्यकरिणीवर प्रा जोशी, प्रा सुतार, डॉ निवेदिता मानमोडे, प्रा सावलकर यांच्या नियूक्त्या*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी – दिलीप येवले
नागपुर :- राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषदेचा वर्षपुर्ती सोहळा दि. ९/०६/२०२१ रोजी आभासी सभेचे आयोजन करून पार पडला. या सभेत परिषदेच्या वर्षभरातील कार्याचा आढावा घेण्यात आला. या सभेत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुमित पवार सर यांनी परिषदेच्या वाटचालीवर समाधान व्यक्त करत, परिषदेच्या कार्याला आणखी गतिशिल करण्याच्या दृष्टीने काही संघटनात्मक नियूक्त्या सर्वानुमते सुचवल्या.
राज्य कार्यकारिणीच्या कार्याध्यक्ष पदी प्रा. संजिव सुतार यांची नियुक्ती करण्यात आली.
प्रा. रवीकांत जोशी यांची राज्य कार्यकारिणी सदस्य पदी नियुक्ती . तर
प्रा पद्माकर सावलकर यांची नागपूर विभागिय महासचिव पदी नियुक्ती करण्यात आली.
तसेच प्रा. डाॅ. सौ. निवेदिता मानमोडे यांची नागपूर विभागिय उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
परिषदेचे पदाधिकारी व काही क्रियाशील सभासद मागील एक वर्षांपासून परिषदेच्या विकासात्मक कार्यात महत्त्वाची भूमिका बजावत असूनआहेत. शैक्षणिक साहित्याची निर्मिती, विविध उपक्रम राबवणे तसेच सभांचे आयोजन करणे यासारख्या कार्यास गती देण्याचे कार्य करत आहे. राज्यशास्त्र विषयाचे अध्यापन प्रभावी होण्यासाठी आणि दर्जेदार विद्यार्थ्यांच्या निर्मिती साठी परिषद सतत प्रयत्नशील आहे व पुढेही वाटचाल करत राहिल.असा आशावाद नवनियुक्त सभासदांनी व्यक्त केला.
Maharashtra News Media सच की आवाज