Breaking News

*मा. आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस रक्तदान शिबीरात रक्तदान करून साजरा* *युवा सेना कन्हान शाखा द्वारे आयोजन*

*मा. आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस रक्तदान शिबीरात रक्तदान करून साजरा*

*युवा सेना कन्हान शाखा द्वारे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – युवा सेना प्रमुख मंत्री मा.आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्य युवा सेना कन्हान शाखा द्वारे समाज भवन सत्रापुर येथे रक्तदान शिबीरात ४७ युवकांनी रक्तदान करून वाढदिवस साजरा करण्यात आला.


रविवार (दि.१३) जुन २०२१ ला युवासेना प्रमुख व पर्यटन, पर्यावरण व राज्य शिष्टाचार मंत्री मा.आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन युवा सेना कन्हान शाखा द्वारे समाज भवन पंचशिल नगर सत्रापुर कन्हान येथे नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर, उपाध्यक्ष डॅनियल शेंडे, युवासेना जिल्हा प्रमुख शुभम नवले, अमोल गुजर, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष नागपुर जिल्हा (ग्रा) प्रमुख सुत्तम मस्के, माथाडी कामगार सेना जिल्हा प्रमुख राजन सिंह, दुरसंचार समिती सदस्य कैलास खंडार, उपजिल्हा प्रमुख प्रेम रोडेकर, युवासेना जिल्हा समन्वयक लखन यादव, नगरसेविका मोनिका उमेश पौनिकर आदिं च्या प्रमुख उपस्थिति मध्ये रक्तदान शिबीर आयोजन करून शिबीरात रक्तदान करणार्या ४७ युवकांना मान्यवरांच्या हस्ते बँग व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. रक्तदान शिबीराने मा. आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस थाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता रामटेक विधानसभा चिटणीस लोकेश बावनकर, उमेश पौनिकर, कन्हान युवासेना प्रमुख समीर मेश्राम, युवा सेना उपशहर प्रमुख आकाश ठाकरे, युवासेना कन्हान शहर समन्वयक ओजस कुंभलकर, निखिल लोणारे, खंडाळा युवासेनाचे राजन मनगटे, मंगेश पाटील, मंगेश खंगार, प्रमोद मारबते सह आदि शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …