Breaking News

*कांन्द्री येथे गळफास लावुन युवकांची आत्महत्या* *फर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी मर्ग दाखल करुन पुढील तपास सुरू केला*

*कांन्द्री येथे गळफास लावुन युवकांची आत्महत्या*

*फर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी मर्ग दाखल करुन पुढील तपास सुरू केला*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत जय दुर्गा नगर कांन्द्री येथील राहुल गुप्ता या २२ वर्षीय युवकाने गळफास लावुन आत्महत्या केल्याने फिर्यादी यांच्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास करित आहे .
प्राप्त माहिती नुसार शनिवार (दि.१२) जुन २०२१ ला सायंकाळी ५:३० ते १०:०० वाजता च्या सुमारास मृतक राहुल राजबली गुप्ता वय २२ वर्ष रा. जय दुर्गा नगर वार्ड क्रमांक ४ कांन्द्री (कन्हान) या युवकाने गळपास लावुन आत्महत्या केली. आत्महत्याचे कारण अजुन ही कळु शकले नसुन कन्हान पोलीसांनी फिर्यादी राजबली मोतीलाल गुप्ता मृतकांचे वडील यांच्या तक्रारी वरून रविवार (दि.१३) जुन २०२१ ला १:३८ वाजता मर्ग दाखल करण्यात आला. सदर प्रकरणाचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरूण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात पोलीस शिपाई राहुल रंगारी करित आहे.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …