*सर्व साधारण शेतकरी कृषी योजना पासून वंचित*
*कृषी विभागातील अधिकारांच्या मागे मारत आहे शेतकरी चकरा*

*शासनाच्या योजना कृषी विभागाच्या संबधित जवळील व्यक्ती, ओळखीच्या, आणि मोठ्या लोकांच्या घरात तर गरीब शेतकऱ्यांनाचा पत्ता गोल*
बेलोना प्रतिनिधी: चंद्रशेखर मस्के
नरखेड – पंचायत समिती अंतर्गत कृषी विभागातील संबधित अधिकारांच्या निष्काळजी पण मुळे शेतकरी राहत आहे वंचित.शेतकऱ्यांनी ऑनलाईन महाडिबिटी पोर्टल मधे बी बियाणे साठी रजिश्टेशन केलं त्यात त्यांना 100,200 रुपये खरचं आला त्यांचा वेळ गेला .ज्यांनचे महाडिबिटी पोर्ट मधे (लकी ड्रॉ मधेनाव आले त्यांना मंडळ कृषी अधिकारी कार्यालय नरखेड यांच्या कडून परमिट देण्यात आले.त्यामुळे शेतकरी परमिट घेऊन दुकानात गेले त्यांना कापूस बियाणे तर मिळाले कर काहींना स्वयांबिन परमिट असून सुधा मिळाले मिळाले नाही त्यामुळे भरपूर शेतकरी नाराजित आहेत आता परमितचे काय करावे आमचे पैसे पण गेले वेळ पण गेला आणि आम्हाला लागत असलेले सव्याबिन बी सुधा मिळाले नाही त्यामुळे ते आता अधिकारी यांच्यामागे चकरा मारत आहे .तर अधिकारी शेतकऱ्यांना परमिट देऊन मोकळे होत आहे .तसेच बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प आंतर्गत नरखेड तालुक्यातील बेलोना,खरसोली,खेडी कर्यात,मोहदी दळवी,भयावडी,अंबाडा, मन्नातखेडी, मोगरा, टोळापाल, पिपळगाव ,येनिकोनी, नांदा (शिंदे ) बानोर मसोरा, सावरगाव,प्रतेकी ऐका,ऐका गावातून 30,व्यक्तीची निवड करून त्यांना प्रतेक व्यक्तीस 475ग्राम चे दोन पॉकीट अंकुर 3028ची देण्यात आले ही चर्चा गाव गावात पसरताच प्रतेक गावातील गरजू वंत गरीब शेतकरी कृषी विभागाकडे धाव घेऊ लागले की मला पण बी बियाणे द्या आणि आम्हाला या प्रकल्पा बदल माहिती द्या तर मंडल कृषी अधिकारी एस डी लाडे यांनी कृषी सेवक यांनी ज्या शेतकऱ्यांची निवड झाली त्यांची शेती शाळा घेऊन बियाणे लागवड खत व्यवस्थापन आंतर मशागत रोग नियत्रणासाठी फवारणीचे प्रशिक्षण दिले जाणार आहेत ,शेतकऱ्यांना शेती तज्ञ,तालुका अधिकारी मंडळ अधिकारी,कृषी अधिकारी यांचे मार्गदर्शन राहणार आहेत . एक बियाणे एक उत्पादन एक गुणवत्ता आल्यामुळे कापसाला चांगला भाव मिळेल तसेच कृषी सेवक यांच्याकडून माहिती काढली असता ज्या गावातील शेतकरी आले आहेत त्यांना तुमच्या गावातील 30 शेतकऱ्यांची निवड झाली आहे आता तुम्हाला नाही भेटणार तुम्ही जा असे बजावून सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी यांना विचारण्यात आले की यांची निवड कशी करण्यात आली तर अधिकारी यांनी तुमच्या गावातील 100 शेतकऱ्यांची निवड करून त्यातील 30शेतकऱ्यांना देण्यात आले तसेच जे शेतकरी गट आहेत त्यांना देण्यात आले आहेत या शेतकरी गटाची नावे आणि या 100 लोकांची नावे मागितली यांची निवड कशी करण्यात आली आम्हाला आमच्या गावात का माहिती नाही आणि 30 शेतकऱ्यांची निवड झाली ते सांगा पण अधिकारी यांना कोरोना असल्यामुळे जे व्यक्ती या कार्यक्रमाच्या वेळेस उपस्थिती होते त्यांच्या सहायाने गावातील 30 शेतकऱ्यांचे नावे घेण्यात आली असे सांगत होते परंतु शेतकऱ्यांनी अधिकारी वर्गाला चांगलेच धरून ठेवले असता कोरोना मुळे इतक्या गावातील शेतकरी आले कशे आणि याना कशे माहीत मग आम्हाला का नाही माहीत आणि इतके शेतकरी जर या कार्यक्रमात होते तर त्यांची सी सि टिव्ही पुटेज दाखवा,त्यांची नावे संगा, आम्हाला तरच आम्ही खरे समजू . फार कमी गावातील गरीब आणि होतकरू शेतकऱ्यांना च याचा खरोखर फायदा झाला असेल परंतु बाकी मोठे शेतकरी हे येथील प्रचंड प्रमाणात शासनाच्या योजना घेण्या साठी येत असतात तसेच शासकीय कृषी अधिकारी यांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना फोनवरून सर्व माहिती देत असतात आणि त्यांनाच याचा लाभ मिळतो अशे कितीतरी शेतकरी आहेत की ते दर वर्षाला बी बियाणे खत औषधे शेतीला लागणारे अवजारे हे याच शेतकऱ्यांना मिळतात तर जे अत्यंत गरीब शेतकरी दर वर्षी येत असतात साहेब काय आहे आमच्या शेतीसाठी तर त्यांना सरळ सांगितल्या जातात की काहीच नाही आले त्यामुळे शेतकरी आपला चेहरा उतरवून आपल्या गावी परत जात असतात त्यांची चप्पल झिजून जातात या कृषी अधिकारी यांच्या मागे फिरू फिरू पण त्यांना पात्र असून सुधा कुठलीच योजना मिळत नाही .त्यामुळे सर्व साधारण शेतकऱ्यांवर होणार अन्याय कृषी मंत्री तसेच समधित अधिकारी व काटोल क्षेत्राचे मा.ना.अनिल देशमुख साहेब यांनी याकडे तत्काळ लक्ष देऊन नरखेड तहसील मधील होत असलेल्या सर्व सामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा आणि जे अधिकारी या आपल्या स्वार्थासाठी आपल्या जवळील शेतकऱ्यांना प्रतेक योजनेचा लाभ देण्यासाठी प्रत्यक्ष फोन करून माहिती देतो आणि इतर शेतकऱ्यांन पासून माहिती लपवतो तसेच त्यांना कुठल्याच योजनेचा लाभ मिळू देत नाही अश्या अधिकारी वर्गावर कार्यवाही करावी.
तसेच जे गाव कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पात आहे त्या गावातील 30 शेतकत्यांन पैक्की जर कोणी असेल तर त्यांनी नरखेड कृषी अधिकारी कार्यालय येथे येऊन अंकुर 3028 चे ब्याग घेऊन जावे अशी तीव्र नाराज शेतकऱ्यांचे म्हणणे आहेत.
Maharashtra News Media सच की आवाज