*पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या टाक्या स्वच्छ करून ब्लिचींगयुक्त स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची मागणी* *नगरिकांचे नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांना निवेदन*

*पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या टाक्या स्वच्छ करून ब्लिचींगयुक्त स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची मागणी*

 

*नगरिकांचे नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांना निवेदन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान – पिपरी नगरपरिषद अंतर्गत पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टाक्या मागील कित्येक वर्षापासुन साफ सफाई न केल्याने नांगरीकां च्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याने सामाजिक कार्यकर्ता मिलिंद मेश्राम व प्रशांत मसार यांच्या नेतृत्वात शहरातील नागरिकांनी नप मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांना एक निवेदन देऊन पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या टाक्या स्वच्छ करून ब्लिचींगयुक्त स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे .
कन्हान शहर अंतर्गत पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टाक्या मागील कित्येक वर्षापासुन साफ सफाई करून स्वच्छ करण्यात आले नाही . तसेच पाण्यात ब्लिचींग ही टाकण्यात येत नाही आहे. यामुळे नांगरीकां च्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. यास्तव कन्हान शहरातील नांगरीकांनी नगरपरीषद नगराध्यक्षा करूणा आष्टणकर व मुख्यधिकारी गिरीश बन्नोरे यांना निवेदन देऊन या जिवघेण्या समस्येस गांभीर्या ने लक्षात घेऊन तात्काळ योग्य उपाय योजना करुन शहरा अंतर्गत येणाऱ्या सर्व पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या टाक्या साफ सफाई व स्वच्छ करून नियमीतपणे ब्लिचींयुक्त पिण्याचे पाणी टाक्यातुन पुरवठा करण्यात यावे. अशी मागणी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ता मिलींद मेश्राम, प्रशांत बाजीराव मसार, राजेश गजभिये, अशोक नार नवरे, दिपक कुंभारे, नरेंन्द्र सोनेकर, विपीन गोंडाणे, भोला भोयर, कुंदन रामगुंडे, दिपक तिवाडे, अरविंद चांदुरकर, महेंन्द्र वानखेडे, चंदन मेश्राम, विनोद येलमु ले, रमेश ठाकरे, क्रिष्णा गांवडे, पंकज गजभिये सह आदि नांगरीकांनी केली आहे .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …