*शासकीय बैठकीच्या नावावर काॅंग्रेसचा मेळावा आमदार टेकचंद सावरकर यांचा आरोप*
*विधान सभेत मंत्री सुनिल केदार यांच्या विरुद्ध विशेषाधिकार प्रस्ताव आणणार – आमदार टेकचंद सावरकर*
*आढावा बैठक आयोजित करण्याचे अधिकार पालकमंत्री यांना असतात – आमदार टेकचंद सावरकर*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
नागपुर / कामठी – कामठी तालुक्यात सोमवार दिनांक १४ जुन २०२१ ला महाराष्ट्र राज्याचे मंत्री श्री सुनिल केदार यांच्या शासकीय बैठकी मध्ये संवैधानिक पदावर असलेल्या सन्माननीय आमदार श्री टेकचंद सावरकर यांची बैठक ची व्यवस्था बरोबर न केल्याने , विकासाच्या विषयावर बोलु न दिल्याने , काॅंग्रेस पार्टी चे महासचिव सुरेश भोयर व कार्यकर्ते आमदार टेकचंद सावरकर यांच्या आंगावर धावुन आल्याने आमदारांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ त्यांचा अपमान केल्याने आमदार टेकचंद सावरकर यांनी बैठकीचा जाहिर निषेध करीत बैठक आयोजित करणाऱ्या अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी पत्रकार परिषद द्वारे केली आहे .
मंगळवार दिनांक १५ जुन २०२१ ला पत्रकार परिषद मध्ये कामठी विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री टेकचंद सावरकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषद च्या पत्रा मध्ये सांगितले कि दिनांक १४ जुन २०२१ ला राज्याचे मंत्री श्री सुनिल केदार यांनी कामठी तालुक्यात शासकीय कामांचा आढावा घेण्याकरिता शासकीय आढावा बैठकी चे आयोजन राज राॅयल लाॅन कामठी येथे करण्यात आले असुन सदर बैठकीला कामठी विधानसभेचे आमदार या नात्याने तहसिलदार यांचे दिनांक १२ जुन २०२१ च्या पत्रान्वये आमदार टेकचंद सावरकर यांना निमंत्रित करण्यात आले असुन या प्राप्त निमंत्रणानुसार व कामठी – मौदा विधानसभा क्षेत्राचे आमदार या नात्याने आमदार टेकचंद सावरकर यांनी बैठकीला उपस्थिति दर्शवली परंतु बैठकीमध्ये आमदार टेकचंद सावरकर यांना शिष्टाचारातुन व्यासपिठावर खुर्ची देण्यात आली नसुन व आमदार टेकचंद सावरकर यांना काॅंग्रेस च्या पदाधिकार्या नंतर आठव्या क्रमांकावर बसविण्यात आले . तसेच विद्यमान जिल्हा परिषद पदाधिकारी यांना व्यासपिठावर जागा सुद्धा देण्यात आली नसुन २ विषयानंतर तहसिलदार हे आमदार टेकचंद सावरकर यांचे स्वागताकरिता आले असता आमदारांनी कोव्हिड नियमा अंतर्गत स्वागत नाकारले व माननीय मंत्री महोदयांना विकासाच्या विषयावर बोलनेकरिता परवानगी मागीतली परंतु मंत्री महोदयांनी आमदार यांना तुम्हाला बोलता येणार नाही असे म्हटले त्यामुळे आमदार टेकचंद सावरकर यांनी मुख्य माईक कडे जाण्यास सुरवात केली असता मंत्री महोदय व काॅंग्रेस पार्टीचे महासचिव श्री सुरेश भोयर व कार्यकर्ते आमदार टेकचंद सावरकर यांच्या आंगावर धावुन आले व आमदारांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्या प्रसंगी आमदारांनी मंत्री सुनिल केदार यांना विचारणा केली असता कि सदर बैठक शासकीय बैठक आहे कि काॅंग्रेस मेळावा यावर सुनिल केदार यांनी कोणतेही उत्तर दिले नाही . त्यानंतर आमदार टेकचंद सावरकर यांनी बैठकीचा जाहिर निषेध करीत मंत्री सुनिल केदार यांना खडेबोल सुनावत बैठकीचा निषेध करीत बैठकीतुन निघुन गेले .

*माझा अपमान नसुन मी नेतृत्व करणाऱ्या ५ लाख लोंकाचा अपमान आहे – आमदार टेकचंद सावरकर*
या प्रसंगी आमदार टेकचंद सावरकर यांनी सांगितले कि मी महाराष्ट्र विधानसभेचा सदस्य असुन ५ लाख लोकांच नेतृत्व करतो त्यामुळे सुनिल केदार हे जरी आपल्या दादागिरी करीता प्रसिद्ध असेल तरी ते माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करु शकत नाही असे आमदार टेकचंद सावरकर यांनी मत व्यक्त केले असुन आमदार टेकचंद सावरकर यांनी काॅंग्रेस पार्टी हे दादागीरीच करु शकतात विकासा सोबत यांचा काही ही संबंध नाही . तसेच संवैधानिक पदावर असल्याने काॅग्रेंसच्या महासचिव सुरेश भोयर यांनी माझा केलेला अपमान हा माझा अपमान नसुन मी नेतृत्व करणाऱ्या ५ लाख लोंकाचा अपमान आहे . असे मत आमदार टेकचंद सावरकर यांनी पत्रकार परिषद मध्ये व्यक्त केले आहे .
*आढावा बैठक आयोजित करण्याचे अधिकार पालकमंत्री यांना असतात – आमदार टेकचंद सावरकर*
पत्रकार परिषद मध्ये बोलतांना आमदार टेकचंद सावरकर यांनी मंत्री सुनिल केदार यांचे वर भाष्य करीत सांगितले कि शासकीय आढावा बैठक आयोजित करण्याचे अधिकार पालकमंत्री यांना असतात परंतु सुनिल केदार यांना नागपुर जिल्ह्याचे पालकमंत्री पद न मिळाल्याने सुनिल केदार यांचा भ्रमनिरास झाला असल्याने ते आपला सावनेर मतदारसंघ सोडुन ईतर मतदारसंघामध्ये आढावा बैठकी घेत फिरत असतात व सदर बैठकीला मा. पालकमंत्री यांना सुद्धा विश्वासात घेत नसुन शासनाच्या पैश्याचा अपवय करुन शासकीय बैठकीच्या नावावर काॅंग्रेस मेळावे घेत फिरत असतात म्हणुन सत्तेचा दुर दुरुपयोग करणार्या सुनिल केदार यांचा आमदार टेकचंद सावरकर यांनी निषेध केला असुन संबंधित बैठक आयोजित करणाऱ्या अधिकार्यांवर सुद्धा कारवाई करण्याची मागणी केली आहे .

*विधान सभेत मंत्री सुनिल केदार यांच्या विरुद्ध विशेषाधिकार प्रस्ताव आणुन – आमदार टेकचंद सावरकर*
कामठी तालुक्यात सोमवार ला झालेल्या बैठकी मध्ये मंत्री महोदयांनी आमदार टेकचंद सावरकर यांची बैठक व्यवस्था ठेवली नसुन त्यांना बोलु दिल नाही आमदार टेकचंद सावरकर यांनी बोलण्याचा प्रयत्न केला तर ज्या काॅंग्रेसच्या लोकांना निमंत्रण नव्हता ते आमदार टेकचंद सावरकर यांच्या आंगावर धावुन आले ते सुनिल केदार यांच्या आजु बाजुला ते लोक बसले होते . हा आमदारांचा अपमान आहे . असे आमदार टेकचंद सावरकर यांनी पत्रकार परिषद मध्ये बोलले असुन पाच लाख लोकांच्या प्रतिनिधित्व करणारा आमदार असतो . कादाचित विर्दभात ऐवढा मोठा लोकसंख्या असणारा हा कामठी विधानसभा क्षेत्र आहे आणि अश्या परिस्थिति मध्ये आमदार टेकचंद सावरकर यांना बोलु दिल नसल्याने आमदार टेकचंद सावरकर यांनी निषेध व्यक्त केला असुन निश्चित पणा ने सुरेश भोयर काॅंग्रेस चे नेते त्यांना निमंत्रण नसतांनी ते आले कसे , मला शिविगाळ दिली कसी , मंत्री सुनिल केदार माझ्या अंगावर धावुन आले कसे , निश्चित पणा ने सभागृहात हक्क भंग आणण्यात येईल असे आमदार टेकचंद सावरकर यांनी पत्रकार परिषद मध्ये बोलतांना सांगितले .
*भाजपा पदाधिकारी करतील सुनिल केदार यांचा निषेध – आमदार टेकचंद सावरकर*
कामठी तालुक्यात सोमवार ला घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री श्री सुनिल केदार यांच्या शासकीय बैठकी मध्ये संवैधानिक पदावर असलेल्या सन्माननीय आमदार श्री टेकचंद सावरकर यांचा ” भग साले ” अश्या अशब्द भाषेत बोलुन अपमान केल्याने व विकासाच्या विषयावर बोलु न देणार्या महाराष्ट्राचा महाविकास आघाडीचा दादागिरी करणार्या नेत्यांचा विरोधात भाजप पदाधिकारी यांनी नाराजगी व्यक्त करीत रस्त्यावर उतरुन महाविकास आघाडी सरकार चा विरोधात व काॅंग्रेस नेत्यांचा पदाधिकार्यांचा विरोधात जाहिर निषेध सुरु केला असुन नागपुरात मंगळवार ला आमदार टेकचंद सावरकर यांनी पत्रकार परिषद मध्ये बोलले कि काॅंग्रेस पार्टी चे नेते सुरेश भोयर जे “भग साले” या अशब्द भाषेत माझ्याशी बोलले याचा निषेधार्थ नागरपुर च्या १३ ही तालुक्यात भारतीय जनता पार्टी चे अध्यक्ष , पदाधिकारी हे पोलीस स्टेशन येथे , व तहसीलदाराला निवेदन देऊन सुरेश भोयर यांच्या वर गुन्हा दाखल करण्याची मागणी करतील आणि मंत्री सुनिल केदार यांच्या निषेध करतील असे आमदार टेकचंद सावरकर यांनी पत्रकार परिषद मध्ये बोलतांना सांगितले आहे .
Maharashtra News Media सच की आवाज