*पाच रुग्णांच्या मुत्युची चौकशी करून दोषीयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी* *कन्हान शहर विकास मंच पदाधिकाऱ्यांचे जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन*

*पाच रुग्णांच्या मुत्युची चौकशी करून दोषीयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी*

*कन्हान शहर विकास मंच पदाधिकाऱ्यांचे जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कांन्द्री येथील जवाहरलाल नेहरू चिकित्सालयात ऑक्सीजन च्या अभावीमुळे व प्रशासनाच्या बेजबाबदार पणामुळे दोन महिन्यापुर्वी पाच रुग्णांचा मुत्यु झाल्याची अत्यंत दुर्देवी घटना घडल्यावर ही कन्हान पोलीसांनी या प्रकरणाची आता पर्यंत चौकशी न केल्याने कन्हान शहर विकास मंच पदाधिकाऱ्यांनी मंच सचिव प्रदीप बावने यांचा नेतृत्वात जिल्हाधिकारी मा. रविंन्द्र ठाकरे यांचा मार्फत राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे साहेबांना निवेदन पाठवुन तात्काळ पाच रुग्णांच्या मुत्यु प्रकरणाची चौकशी करून दोषीयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करित मृतक कुटुंबाना आर्थिक मदत करून न्याय देण्याची मागणी केली आहे.
मंगळवार १३ एप्रिल २०२१ ला कांन्द्री येथील वेकोलि च्या जवाहरलाल नेहरू चिकित्सालयात ऑक्सीजन च्या अभावामुळे व प्रशासनाच्या बेजबाबदार पणामुळे १) अमित दिनदयाल भारद्वाज (३१) पटेल नगर कन्हान २) कल्पना अनिल कडु (३८) टेकाडी, ३) किरण राधेश्याम बोराडे (४७) टेकाडी, ४) हुकुमचंद पी येरपुडे (५७) रायनगर कन्हान व ५) नमिता श्रीकांत मानकर (३३) रायनगर कन्हान अश्या पाच कोरोना रुग्णांचा मृत्यु झाल्याची अत्यंत दुर्देवी घटना घडल्याने मृतकांचा कुटुंबानी कन्हान पोलीस स्टेशन येथे प्रशासनाच्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांन विरुद्ध तक्रार दाखल केल्यावर ही कन्हान पोलीसांनी आता पर्यंत कुठल्याही प्रकारची चौकशी व कारवाई न केल्यामुळे मृतकांच्या कुटुंबात शासन प्रशासना विरुद्ध रोष निर्माण होत असल्याने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकाऱ्यांनी मंच सचिव प्रदीप बावने यांच्या नेतृत्वात मा.रविंन्द्र ठाकरे जिल्हाधिकारी नागपुर यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे साहेबांना निवेदन पाठवुन व प्रतिलीपी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, राज्याचे गृहमंत्री, नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक श्री राकेश ओला यांना निवेदन देऊन तात्काळ पाच रुग्णांच्या मुत्यु प्रकरणाची चौकशी करून दोषीयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करित मृतकांच्या कुटुंबाना आर्थिक मदत करून न्याय मिळुन देण्याची मागणी केली आहे. याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचिव प्रदीप बावने, कोषाध्यक्ष हरीओम प्रकाश नारायण, सुषमा मस्के, पौर्णिमा दुबे सह मंच पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

*माजी पालकमंत्री ची दहा लाखांची मागणी थंड बसत्यात.*

जिल्ह्याचे माजी पालकमंत्री श्री चंन्द्रशेखर बावनकुळे यांना कांन्द्रीच्या जवाहरलाल नेहरू चिकित्साल यात ऑक्सीजन अभावामुळे व प्रशासनाच्या बेजबाब दार पणामुळे झालेल्या पाच रुग्णांच्या मृतक कुटुंबियांना दहा लाख रुपयांची मदत देण्याची मागणी राज्य शासनाकडे केलेली होती. मात्र घटनेच्या दोन महिन्या नंतर ही कुठलीही शासकीय मदत अद्याप पोहचलेली नसुन कुठल्याही सत्ता पक्षाच्या नेत्यांनी सांत्वना भेट देखील घेतली नसल्याने मृतक कुटूंबियांचा न्यायाच्या प्रतिक्षेत श्वास गुदमरत असल्याची प्रचिती येत आहे.

*नाशिक येथील घटनेस राज्य शासनाने केली मदत*

नाशिक पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात आॉक्सिजन च्या अभावामुळे २५ जणांचा मृत्यू २१ एप्रिल ला झाला होता. मृतांना राज्य सरकार कडून ५ लाख तर नाशिक पालिके कडून ५ लाख रुपये अशी मदत तात्काळ जाहीर करण्यात आलेली होती. तर याच महिन्यात १३ एप्रिल रोजी झालेल्या कांन्द्री जवाहरलाल नेहरू चिकित्सालयात ऑक्सिजन अभावा मुळे झालेल्या पाच मृतकांच्या कुटूंबीना अद्याप ही शासकीय मदती पासुन वंचित असल्याने पुन्हा एकदा सिस्टीमचा भेदभाव चव्हाट्यावर आलेला आहे. दोन महिन्यांच्या काळ लोटलेला आहे, नाशिक घटनेत नंतर तात्काळ मदतीसाठी राज्यशासनाची यंत्रणा कामी लागली. त्या प्रकारची नागपुर जिल्ह्यातील या घटनेसाठी कुठलीही यंत्रणा किंवा कार्यक्षेत्रातील मंत्री,आमदार, खासदार यांनी देखील पीडित कुटुंबियांन कडे पाठ केली असुन माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या पीडित कुटूंबियांना प्रत्येकी दहा लाखांच्या मागणी देखील थंड बसत्यात गेल्याचे चित्र आहे. अश्यात तात्काळ जिल्हा यंत्रणेने दखल घेऊन प्रकरणी न्याय मिळवुन देण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …