*कोरोना सारख्या कठीण प्रसंगी आपल्या जीवाची पर्वा न करता पोलिसांनी जिल्ह्यात केलेलं कार्य कौतुकास्पद – आमदार डॉ.देवराव होळी*
*गडचिरोली जिल्ह्यात प्रथमच लोकप्रतिनिधी द्वारा पोलीस विभागाचे मनोबल उंचावण्यासाठी कोरोना योद्धा म्हणून सत्कार*
*गडचिरोली जिल्ह्यातील दोन हजार निवडक अधिकारी कर्मचारी यांचा करनार सत्कार*
गढ़चिरोली प्रतिनिधि -सूरज कुकुडकर
गडचिरोली – सारख्या अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात कोरोणासारख्या कठीण प्रसंगी आपल्या जिवाची पर्वा न करता पोलिसांनी केलेले कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे त्यांच्या कार्याचा गौरव कोविड योद्धा म्हणून करताना मला एक लोकप्रतिनिधी म्हणून समाधान मिळत असल्याचे प्रतिपादन आमदार डॉक्टर यांनी म्हटले आहे*
*भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत कोविड -19 या जागतिक महामारीच्या विरोधात संपूर्ण देश लढा देत आहे ,या घातक महामारीत जिल्ह्यातील पोलीस अधिकारी कर्मचारी व डॉक्टर्स यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी केलेले कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे ,त्यांनी दाखवलेली हिम्मत ,साहस ,सातत्य खरोखरच प्रेरणादायी आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला सात वर्षे पूर्ण झाले आहे*

*यानिमित्ताने गडचिरोली जिल्ह्यातील दोन हजार निवडक अधिकारी ,कर्मचारी व डॉक्टर्स आरोग्य विभागाचे कर्मचारी यांना कोविड योद्धा म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरव करण्याचा संकल्प आमदार डॉ देवराव होळी यांनी केलेला आहे*

*या निमित्याने आमदार डॉ देवरावजी होळी यांनी कोविड योद्धा म्हणून गौरव करण्यासाठी अतिसंवेदनशील असलेल्या पोटेगाव पोलीस स्टेशन ला भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित पोलीस उपनिरीक्षक प्रभारी अधिकारी श्री बानोत, पोलीस निरीक्षक सी,आर,पि,एफ श्री वाघ व उपस्थित अन्य पोलीस उपनिरीक्षक ,सी,आर,पि,एफ , बटालियन अधिकारी कर्मचारी यांचा कोविड योद्धा म्हणून प्रशस्ती पत्र देऊन गौरव केला* *यावेळी पोलीस स्टेशन पोटेगावचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक बानोत साहेब , एस आर पी एफ चे पोलीस निरीक्षक वाघ सर,भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप चलाख , गडचिरोली भाजप तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे भाजपा ज्येष्ठ नेते जयराम चलाख व पोलीस विभागाचे सेवारत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते*
Maharashtra News Media सच की आवाज