Breaking News

*जिल्हा परिषद शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांचा विकास करू – कैलाश बरबटे* *मौदा पंचायत समिती येथे आढावा बैठक*

*जिल्हा परिषद शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांचा विकास करू – कैलाश बरबटे*

*मौदा पंचायत समिती येथे आढावा बैठक*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

मौदा – देशात कोरोना च्या महामारी मुळे सर्व शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाल्याने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद सर्कल मधील चाचेर निमखेड़ा शाळेचा
प्रत्येक विद्यार्थ्यांचा विकास व्हावा म्हणून शासन कोरोडो रूपये शिक्षण क्षेत्रावर खर्च करतो. चाचेर निमखेड़ा जिल्हा परिषद सर्कल मधील जिल्हा परिषद शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांचा विकास झाला तरच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होईल ,आपल्या क्षेत्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांचा विकास करण्यासाठी आपले प्रयत्न राहील असे आव्हान जिल्हा परिषद सदस्य कैलाश बरबटे यांनी केले आहे
मौदा पंचायत समिति येथे चाचेर निमखेड़ा जिल्हा परिषद सर्कल मधील जिल्हा परिषद शाळेतील समस्या बाबत आढावा बैठक जिल्हा परिषद सदस्य कैलाश बरबटे यांच्या उपस्थितित घेण्यात आली. या बैठकिला गटशिक्षणाधिकारी आशा गणवीर, पंचायत समिती सदस्य खेमराज चापले व केंद्र प्रमुख उपस्तित होते.
प्रत्येक शाळेत सुरक्षा भिंत असणे गरजेचे आहे. शाळेत मुलांना शालेय गणवेश, व पुस्तक मिळावे . त्याच बरोबर संगणक , मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी आरओ फिल्टर बसवूण शुद्धय पाणी मिळावे, विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून त्यांना पोषण आहार मिळावा. प्रत्येक विद्यार्थ्यांचा विकास व्हावा कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये याबाबत चर्चा करण्यात आली. प्रत्येक विद्यार्थांचा विकास होईल व कोणी ही विद्यार्थी शिक्षणा पासुन वंचित होऊ नका असे कडकडीचे आव्हाहन जिल्हा परिषद सदस्य कैलाश बरबटे यांनी विद्यार्थांशी केले आहे .

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …