*जमिनीच्या मालकी हक्काच्या जुन्या वादातुन पोटभरे परिवारात मारहाण एक जख्मी.*
*दोन्ही गटा च्या तक्रारीवरून कन्हान पोलीस स्टेशन येथे एकमेका विरूध्द गुन्हा दाखल.*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत कांन्द्री बस स्टाॅप येथे फिर्यादीचा मुलाने मित्राकडुन उधारी दिलेले रूपये परत मांगुन आणले असता आरोपी हा दारुच्या नशेत फिर्यादी व फिर्यादीच्या मुलाजवळ येऊन जुन्या भांडण्याचा कारणावरुन फिर्यादी सोबत वाद-विवाद करुन मारहाण केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी सौ इंद्रकला पोटभरे च्या तक्रारी वरून तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहितीनुसार सोमवार दिनांक.१४ जुन २०२१ ला सायंकाळी ६:०० वाजता दरम्यान फिर्यादी सौ इद्रकला रामकृष्ण पोटभरे वय ५८ वर्ष राहणार. कांन्द्री बस स्टाॅप जवळ वार्ड क्रमांक. ५ चा मुलगा रविंन्द्र याने मित्र रंजित उइके याला उधारीचे दिलेले ५००० रुपये परत मांगुन घेतले असताना आरोपी क्र. १) दिपक पोटभरे हा दारु पिऊन दारुच्या नशेत फिर्यादी व फिर्यादीचा मुला जवळ ये़ऊन जुन्या भांडण्याच्या कारणावरुन फिर्यादी सोबत वाद-विवाद करुन दिपक पोटभरे ने फिर्यादीच्या हातातील ५००० रुपये हिसकावले असता फिर्यादीच्या मुलाने आरोपीस हटकले असता आरोपी दिपक पोटभरे याने फिर्यादी च्या मुला सोबत झगडा भांडण करुन मारपीट करित असतांना आरोपी क्र. २) प्रकाश पोटभरे हातात लोखंडी पाईप घेऊन फिर्यादी जवळ येवुन लोखंडी पाईपाने मारुन जख्मी केले. तेव्हाच फिर्यादीचा मोठा मुलगा नरेन्द्र हा तेथे भांडण सोडविण्यास आला असता आरोपी क्र.३) सुरेश पोटभरे हा तेथे आला आणि त्याने आरोपी प्रकाश पोटभरे याचा हातातील लोखंडी पाईप घेवुन फिर्यादी व फिर्यादीचा मोठा मुलगा नरेन्द्र या दोघांना लोखंडी पाईपाने डोक्यावर, हातावर, पायावर मारुन जख्मी करून तिन्ही आरोपींनी संगणमत करून फिर्यादी व फिर्यादी च्या मुलांना शिवीगाळ करून जीवाने मारण्याची धमकी दिली. अशा फिर्यादी च्या तोंडी रिपोर्ट वरून व वैधकिय अहवालावरून अप क्रमांक १७७/२०२१ कलम ३९२, ३२४, ५०४, ५०६, ३४ भांदवि नुसार गुन्हा नोंद करून तपासात घेतला. सदर कारवाई कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पोलीस हवालदार खुशाल रामटेके, पोना मंगेश ढबाले हे करित आहे.
कांद्री बस स्टाप जवळील पोटभरे कुटुंबात जमिनीच्या मालकी हक्का करिता सुरू असलेल्या जुन्या वादामुळे सोमवार दिनांक.१४ जुन २०२१ ला सायंकाळी ६ वाजता दरम्यान भांडण होऊन एक गंभीर जख्मी झाल्याने कांन्द्री बस स्टाॅप जवळील पोटभरे कुटुंबातील जमिनीच्या मालकी हक्का करिता सुरू असलेल्या जुन्या वादामुळे फिर्यादी दिपक हरिभाऊ पोटभरे यांचे तक्रारी वरून आरोपी १) देवेंद्र पोट़भरे, २) नरेंद्र पोटभरे, ३) सुरेंद्र पोटभरे, ४) रामकृष्ण पोटभरे व ५) सौ इंद्रावती पोटभरे सर्व राहणार.वार्ड क्र ५ कांन्द्री यांचे विरूध्द अप क्र १७६/२०२१ कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, २९४, ५०६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तर सौ इंद्रकला रामकृष्ण पोटभरे वय ५८ वर्ष राहणार कांन्द्री यांचे तक्रारीवरून आरोपी १) दिपक पोटभरे, २) प्रकाश पोटभरे, ३) सुरेश पोटभरे तिन्ही आरोपी विरूध्द अप क्रमांक.१७७/२०२१ कलम ३९२, ३२४, ५०४, ५०६, ३४ भांदवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन कन्हान पोलीस स्टेशन ला दोन्ही गटात एकमेका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला . सदर कारवाई कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरूण त्रिपाठी यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस पुढील तपास करित आहे.
Maharashtra News Media सच की आवाज