Breaking News

*मनोरूग्ण युवकास आपुलकीचा हाथ* *शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष नागपुर जिल्हा प्रमुख पुरूषोत्तम मस्के चा सेवाभावी उपक्रम.*

*मनोरूग्ण युवकास आपुलकीचा हाथ*

*शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष नागपुर जिल्हा प्रमुख पुरूषोत्तम मस्के चा सेवाभावी उपक्रम.*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान शहरात फिरणार्या एका मनोरूग्ण युवकास पुरूषोत्तम मस्के यांनी आपुलकीचा हाथ देत त्यास फळे खाऊ घालुन कटींग, दाढी व आंघोळ करून नविन कपडे देऊन व्यवस्थित करून सेवाभावी उपक्रम राबवुन या मनेरूग्ण युवकाचा चांगल्या डॉक्टरां कडुन उपचार करण्याचा मानस व्यकत केला.
कन्हान शहरात नियमित मनोरूग्ण अवस्थेत फिरणार्या युवकास शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष नागपुर जिल्हा ग्रामिण प्रमुख पुरूषोत्तम मस्के यांनी आपुलकीचा हाथ देत आपल्या शिवनगर कन्हान येथील घरी नेऊन त्यास अगोदर फळे खाऊ घालुन त्याची दाडी कटींग करून स्वच्छ आघोळ करून नविन कपडे घालुन व्यवस्थित अपडेट तयार केले. त्याच्या वागणुकी आणि परिस्थिती वरून तो काही प्रमाणात मनोरूग्ण असल्याचे निदर्शनात आल्याने या युवकाची आरटीपीसी आर तपासणी करून चांगल्या डॉक्टरां कडुन उपचार करून त्यास चांगला नागरिक बनविण्याचा मानस त्यांनी व्यकत केला. या सेवाभावी उपक्रमास सहकारी मित्र किरण ठाकुर व हर्ष पाटील हयांनी सहकार्य केल्या बद्दल पुरूषोत्तम मस्के यांनी त्यांचे आ़़भार व्यकत केले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …