*कन्हान शहरातील महामार्गाचे पथ दिवे नियमित सूरू करण्याची मागणी*
*शिवसेना शहर पदाधिकारी यांचे नगरपरिषद मुख्याधिकारी बन्नोरे यांना निवेदन.*
विशेष प्रतिनिधि – ऋषभ बावनकर
कन्हान : – शिवसेना कन्हान शहर प्रमुख व शिव सैनिका व्दारे नगरपरिषद कन्हान पिपरी मुख्याधिकारी गिरिष बन्नोरे यांना निवेदन देऊन शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील पथ दिवे लावुन नियमित लावण्याची मागणी करण्यात आली.
गुरूवार (दि.१७) ला शिवसेना कन्हान शहर प्रमुख रविंद्र (छोटु) राणे यांच्या नेतुत्वात शिवसैनिकांनी नगरपरिषद कन्हान-पिंपरी कार्यालयात मुख्याधिकारी गिरी़श बन्नोरे यांची भेट घेऊन चर्चा करून कन्हान शहरातील नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गा वरील दोन्ही बाजुचे पथ दिवे बंद असल्याने रात्री महामार्गावर अंधार असल्याने गैर प्रकार घडुन नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने लवकरात लवकर महामार्गाचे दोन्ही बाजुचे पथ दिवे नियमित सुरू करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना कन्हान शहर प्रमुख रविंद्र राणे, चिंटू वाकुडकर, प्रदीप गायकवाड, अजय चव्हाण, हरीश तिडके, भारत पगारे, समशेर पुरवले, सोनु खान, शुभम येलमुले सह शिवसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज