Breaking News

*डॉ आबेंडकर विप्शना सिहोरा येथे भिक्षु-भिक्षुणी ना थेन क्वांग तर्फे किराना किट व चिवरदान*

*डॉ आबेंडकर विप्शना सिहोरा येथे भिक्षु-भिक्षुणी ना थेन क्वांग तर्फे किराना किट व चिवरदान*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कोव्हिड – १९ च्या माहमारी मध्ये अनेक भिक्षु-भिक्षुणी वर अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण हो़ऊन त्यांचेवर उपासमारीचा प्रसंग ओढावत असल्याने अहिल्याबाई होळकर बहुदेशीय शिक्षण संस्थे व्दारे डॉक्टर बाबासाहेब आबेंडकर विप्शना ध्यान , वास्तुसंघग्राहलय व ग्रंथालय सिहोरा (कन्हान) येथे भिक्षु-भिक्षुणी संघास जर्मनी देशातील बुद्धिस्ट उद्योग पती सिस्टर थेन क्वांग जर्मनी यांचे तर्फे किराना किट, चिवर व संघदान करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आबेंडकर विप्शना ध्यान, वास्तु संघग्राहलय, ग्रंथालय सिहोरा (कन्हान) येथे मंगळवार (दि.८) जुन २०२१ ला सकाळी १०.३० वाजता भिक्षु- भिक्षुणी संघास भोजनदान करून भिक्षु-भिक्षुणी संघानी विशेष बुद्धवंदना, रतनसूत्ता द्वारे कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. जर्मनी देशातील बुद्धिस्ट उद्योग पती सिस्टर थेन क्वांग जर्मनी यांचे मार्फ़त प्राप्त किराना किट, चिवर व संघदान राजेश यादव, अनिरुद्ध दुपारे, शरद अवथरे, मालविये सर, भीमराव फ़ुसे, सुरेश गायकवाड, रमेश गजभिये, प्रशांत वाघमारे (गुमथळा), प्रेम रोडेकर आदी मान्यवारांचे हस्ते ५० पेक्षा अधिक भिक्षु-भिक्षुणी संघाना दान करण्यात आले.

कार्यक्रमा चे सुत्र संचालन बुद्धा स्पिरिचुअल पार्कचे संस्थापक व अहिल्याबाई होळकर बहुउदेशिय शिक्षण संस्थाचे सचिव नितिन गजभिये यांनी तर आभारप्रदर्शन आनंद सहारे यानी केले. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता मनोज मेश्राम, दिनेश शेंडे, राजु भेलावे, शेखर दहाट, प्रविण गजभिये, पंजाब गजभिये, वैभव गजभिये आदीने परिश्रम घेतले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …