*आशा व गटपर्वतर्क कर्मचारी युनियन (सिटू) यांच्यातर्फे धरणा आंदोलन*
रामटेक – तालुका शाखेचा वतीने गेल्या 15 जून पासून सुरू असलेल्या आशांचा बेमुदत राज्यव्यापी संपला पाठिंबा म्हणून आज 18 जून रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत रामटेक तहसील कार्यालयासमोर धरणा दिला गेला. या धरणाचे नेतृत्व तालुका सचिव कॉ. कल्पना हटवार व कॉ. नीता भांडारकर यांनी केले व मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार साहेबांना दिले . आशा व गतप्रवर्तक कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या , किमान वेतन 18 हजार द्या , कोरोना काळात दर रोज 500 रुपये द्या , एपीएफ व ई एस आय लागू करा आदी मागण्या या आंदोलनाच्या होत्या। प्रदर्शनात छाया शेंडे , रविंता बावणे , लता टेकाम , उषा शेंडे , माया लोंढे , ज्योती कडबे , सुरेखा ननोरे , करुणा पौणिकर , प्रीती सरोदे , अल्का मसराम सहित 50-60 आशा व गटप्रवर्तक सामील होत्या.
Maharashtra News Media सच की आवाज