Breaking News

*पीडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी समाजसेवींचा पुढाकार*

*पीडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी समाजसेवींचा पुढाकार*

वर्धा जिल्हा प्रतिनिधी – भाऊराव कोटकर

नागपुर:- नागपुर प्रभाग 38 मधील नागरिकांना दु:खाच्या, संकटाच्या या क्षणाला , केंद्र, राज्य सरकार च्या योजनांचा लाभ मिळावा या करिता सामाजिक कार्यकर्ते सचिन लोणकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात घरकुल ट्रेडर्स एकात्मता नगर जयताळा येथे 15/06/2021ते 18/06/2021 असे 4 दिवसाचे शिबिर घेण्यात आले. कोरोना काळात ज्यांनी आपले पालक अथवा घरचा कर्ता व्यक्ती गमावला आहे. अशा परीवारांना शासकीय योजनांची माहीती देवुन आर्थिक साह्य मिळवुन देण्याकरीता मदत करण्यात येत आहे. त्याच बरोबर निराधार योजना, श्रावणबाळ योजना अश्या शासनाच्या अनेक योजनांचे कार्ड गरजु परीवारांना बनवुन देण्यात येत आहे.सोबतच कोरोना लाॅकडाउन मुळे अजुन ही ज्यांचे काम धंधे सुरु नाही झाले. अश्या परीवारांना धान्याचे किट वितरीत करण्यात आले. शक्य असेल ती मदत गरजवंताना करण्यात येत आहे.


सहयोगकर्ते सुधिर कडु,राहुल नागपुरे, बुल्लु बेहरा, पप्पु नितनवरे, देवेंद्र परीहार, रविंद्र कुथे,मुकेश भलावी बादल सोनटक्के,जितु बागडे,राहुल लांजेवार,योगित विश्वकर्मा,नावेद सौदागर,केतन हाडके,रोशन ठाकरे, आशिष फुंडे,आकाश तुरकर,शुभम ढोबळे,आकाश पांडे,सुशांत पिल्लारे, चंद्रशेखर शाहु,निरज तांबुसकर,मनिराम दिग्रसे,मंगेश ढोरे आणि ईतर स्थानिक नागरिकांनी या शिबिरात करिता सहयोग केले.
अशी माहीती शिबीर संयोजक
श्री सचिन लोनकर यांनी दिली.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …