*माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरी यांची भेट घेऊन दिले निवेदन*
वर्धा जिल्हा प्रतिनीधी – भाऊराव कोटकर
निवेदना द्वारे खालील मागण्या
1)हिंगणघाट शहराच्या मध्यभागातून नॅशनल हायवे क्रमांक ०७ नागपूर हैदराबाद रोड जात असून संविधान चौक (क्लोडे मंगल कार्यालय रोड) ते उपजिल्हा रुग्णालय पर्यंत केंद्र सरकारच्या सी.आर.एफ फंडातून उड्डाणपुलाचे बांधकाम करण्याबाबत.
2) वर्धा नदीवर आजनसरा तालुका, हिंगणघाट जि वर्धा रोहिणी,जागजई व दापोली नदी घाट तालुका राळेगाव जि.यवतमाळ या घाटा पैकी एका घाटावर पुलाचे बांधकाम करण्याबाबत.
3)वर्धा नदीवर हिवरा तालुका हिंगणघाट जि.वर्धा ते धानोरा, तालुका राळेगाव जि यवतमाळ येथे पुलाचे बांधकाम करण्याबाबत.
4)वणा नदीवर लाडकी तालुका हिंगणघाट जि.वर्धा ते नागरी ता वरोरा जि चंद्रपूर येथे पुलाचे बांधकाम करण्याबाबत.
5)पोथरा नदीवर काजळसरा तालुका हिंगणघाट जि वर्धा ते मुरदगाव ता.वरोरा जि.चंद्रपूर येथे पुलाचे बांधकाम करण्याबाबत
या सर्व हिंगणघाट तालुक्यातील वरील कामांना मंजुरी प्रदान करून नागरिकांना दिलास द्यावा.
तरी तालुक्यातील व जिल्ह्यातील नागरिकांची अडचण लक्षात घेता केंद्रीय निधीतून (सी.आर.एफ फंड) पुलाचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन केली आहे.