Breaking News

*आमदार दादाराव केेचे यांची नगरपालिका निवडणूक तोंडावर पाहून पुन्हा नौटंकी सुरू*

*आमदार दादाराव केेचे यांची नगरपालिका निवडणूक तोंडावर पाहून पुन्हा नौटंकी सुरू*

वर्धा प्रतिनिधि – पंकज रोकड़े
आर्वी – मा.आमदार दादाराव केेचे यांनी त्यांच्या लेटर हेडवर केंद्र शासनाने वितरित केलेले नगरपरिषद हद्दीतील घरकुल बाबतचा निधी राज्य सरकारने नगरपालिकेला दिला नाही म्हणून दिनांक 18/06/2021 ला लाक्षणिक उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.


परंतु नौटंकी करण्यास पटाईत असलेल्या आमदार महोदयांना राज्य सरकारने दिनांक 11/06/2021 ला हा निधी आधीच नगरपालिका आर्वी ला दिलेला आहे हे माहीत असून सुद्धा निधी मी मिळवून दिला हे दाखविण्यासाठी 11/06/2021 ला प्राप्त झालेल्या निधी साठी 18/06/2021 ला उपोषणाला बसणारे हे महाराष्ट्रातील एकमेव आमदार असणार.


16/06/2021 ला शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष मा.पंकज वाघमारे यांनी नगरपालिका मुख्याधिकारी यांना माहिती मागितली असता हा निधी 11/06/2021 ला प्राप्त झाल्याचे लेखी पत्र मुख्याधिकारी यांनी शहर काँग्रेस कमिटी अध्यक्षांना दिले.
आमदार साहेब ज्या आर्वी शहराने तुमच्या पक्षाला एक नगराध्यक्ष व 23 नगरसेवक निवडून दिले त्यांच्याशी खोटं बोलताना नाही जनाची तर मनाची तरी लाज ठेवा.. नगरपालिका निवडणूक तोंडावर आहे कामच करायचे आहे तर ड्रेनेज सिस्टम मुळे जे रस्ते चिखलमय झाले आहे त्यासाठी काम करा,त्यासाठी तुमच्या तोंडातून एक शब्द निघत नाही.

येणाऱ्या काळात प्रत्येक घरकुल लाभार्थी यांच्या घरोघरी जाऊन या नौटंकी बाबत आर्वी शहर काँग्रेस कमिटी तर्फे पुराव्यासह माहिती दिली जाईल..अशा नौटंकीबाज आमदाराचा जाहीर निषेध…

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …