*पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढ केंद्र सरकारने त्वरित मागे घ्यावी पंतप्रधान व पेट्रोलियम मंत्री यांना दिले निवेदन* *मा. तहसीलदार हिंगनघाट यांचे मार्फत विदर्भ राज्य आंदोलन समिती हिंगणघाट तालुका यांनी दिले निवेदन*

*पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढ केंद्र सरकारने त्वरित मागे घ्यावी पंतप्रधान व पेट्रोलियम मंत्री यांना दिले निवेदन*

*मा. तहसीलदार हिंगनघाट यांचे मार्फत विदर्भ राज्य आंदोलन समिती हिंगणघाट तालुका यांनी दिले निवेदन*

हिंगणघाट प्रतिनिधि – भाऊराव कोटकर

हिंगणघाट – विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आज दिनांक 16 जूनला पेट्रोल-डिझेल-गॅस व इतर वस्तूंच्या प्रचंड जीव घेण्या दरवाढी विरोधात विदर्भात सर्व जिल्हा व तालुका स्तरावर विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतिने निवेदन देण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना तहसीलदार हिंगनघाट यांचे मार्फत निवेदन पाठवून पेट्रोल-डिझेल-गॅस व इतर वस्तूंची प्रचंड झालेली वाढ त्वरित कमी करण्यासाठी आज निवेदन देण्यात आले.कोरोनाच्या महामारीमध्ये जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे.रोजगार,व्यापार,शेती, व्यवहार सर्व ठप्प झाले आहे. अशा वेळीस ही सतत वाढ करून केंद्र सरकार जनतेची लूटमार करीत आहे.
आम्ही निवडून आलो तर पेट्रोल-डिझेल-गॅस सहित महागाई कमी करू असे आश्वासन भाजप सरकारने दिले होते. महागाईसाठी काँग्रेस वर टीका करणारे भाजप नेते मात्र केंद्रात भाजप सरकार बसल्यावर पेट्रोल-डिझेल-गॅसचे भाव दुपटीने वाढविले आहे.या भाववाढीचा विदर्भ राज्य आंदोलन समिती निषेध करते व त्वरित ही भाववाढ मागे घ्या असे केंद्र सरकारला मा. पंतप्रधान व धर्मेंद्र प्रधान पेट्रोलियम मंत्री यांना आवाहन केले.यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समिती हिंगणघाट तालुक्यातील
अमोल दुरवतकर युवा आघाडी हिंगणघाट तालुका उपाध्यक्ष
सुशांक धाबर्डे विद्यार्थी युवा आघाडी शेकापूर बाई सर्कल अध्यक्ष
नितीन सेलकर युवा आघाडी विद्यार्थी अध्यक्ष वर्धा जिल्हा
सतिश कापसे अल्लीपुर सर्कल अध्यक्ष युवा आघाडी
यांच्या सह विदर्भावादी उपस्थित होते

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …