*पाकिस्तान सुपर लीग 20×20 वर खायवाडी करणार्यास अटक 
*5 लक्ष 27 हजाराचा ऐवज जप्त*
विशेष प्रतिनिधी नागपुर
नागपुरः आज दि.15.06.2021 रोजी मा.अप्पर पोलिस आयुक्त श्री नवीन रेड्डी व मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक 2 श्रीमती विनिता साहू यांना गोपनीय माहिती मिळाली की, सदाशिव अपार्टमेंट खरे टाउन पोस्ट सिताबर्डी येथील दुसऱ्या माळ्यावरील फ्लॅटमध्ये नामे शुभम कुमार शंकरलाल राय वय 24 वर्ष रा. बारा पत्थर शिवनी मध्य प्रदेश ऑनलाइन पाकिस्तान सुपर लीग च्या ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट मॅच मध्ये खायवाडी करीत आहे अश्या माहितीवरून रेड कारवाई केली असता शुभम कुमार शंकरलाल राय वय 24 वर्ष हा PSL 2021 चे 20-20 चे लाहोर विरुद्ध क्वेटा या सामन्यात ऑनलाइन खायवडी करताना मिळून आला झडती दरम्यान त्याचे कडून गुन्हा करताना वापरण्यात येणारे 07 मोबाईल ,03 टॅब , 01 मॅक बुक , 01 टीव्ही सेट ऑफ बॉक्स सह , 01 हार्ड डिस्क, 01 पोलो वोस्क वॅगन कार व 67,200/- रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण 5,27,400 रू चा मुद्देमाल वरील एक आरोपीसह जप्त करून सीताबर्डी पोलिस स्टेशन येथे अप क्र.261 /2021 कलम 4,5 महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई श्री नवीन रेड्डी अप्पर पोलीस आयुक्त उत्तर विभाग,
श्रीमती विनिता साहू परिमंडळ क्र. 2 यांचे मार्गदर्शनात सपोनी अचल कपूर , पोउपनी कुणाल धुरट ,सचिन जाधव , पोहवा अनिल त्रिपाठी ,रामदास नारेकर ,प्रशांत देशमुख, राकेश गोतमारे ,आशिष वानखेडे ,अमित भुरे,यांनी पार पाडली.
Maharashtra News Media सच की आवाज