*केरडी रेल्वे उडाण पुलाचे डामरीकरण उखडुन अपघातास निमत्रंण*
*रेल्वेचा उडाण पुल झेड वळणाचा असल्याने अपघाताची शक्यता*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – नागपुर – जबलपुर महामार्गावरील केरडी बस स्टाप पासुन केरडी, तेलनखेडी गावाला जाणार्या रस्त्यावर रामटेक रेल्वे लाईन च्या रेल्वे उडाण पुलाचे जागोजागी डाबरीकरण उखडुन उंचवटे व खोलगट रस्ता झाल्याने वाहन चालकांना जाता येता त्रास सहन करावा लागत असुन अपघातास निमत्रंण देत असुन हा उडाण पुल झेड वळणाचा असल्याने अपघाताची दाट शक्यता वाढली आहे.
नागपुर – जबलपुर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील केरडी बस स्टाप पासुन केरडी, तेलनखेडी गावाला जाणार्या रस्त्यावर असलेल्या नागपुर रामटेक रेल्वे लाईन वर जवळपास दिड वर्षा पुर्वी नविन उडाण पुल बनवुन वाहतुक सुरू करण्यात आली. परंतु या दिड वर्षाच्या कालावधीत कोव्हीड-१९ प्रादुर्भाव रोखण्या करिता संचारबंदी व लॉकडाऊन असल्याने या नविन उडाण पुलावरून वाहतुक कमी असुन सुध्दा या पुला वरील डाबंरीकरण जागो जागी उखडुन उंचवटे व खोलगट रस्ता झाल्याने वाहन चालकांना चांगलीच कसरत करावी लागत असुन अपघातास निमत्रंण देत आहे. मंध्यतरी डागडुगुची करून सुध्दा परत रस्ता उखडत आहे. तसेच झेड वळणाचा हा उडाण पुल असुन उंचावर वाहन चालकांना पलीकडचे वाहन दिसत नसुन सामोर आल्यावर एकाएक दिसत असल्याने अपघाताची दाट शक्यता वाढली आहे . यास्तव संबधित रेल्वे प्रशासनाने या नविन पुल निर्माण कामाची चौकशी करून बांधकाम कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करावी. कारण आता पावसाळयाचे दिवस असुन या नविन उडाण पुलावरील उखडलेल्या डांबरीकरणाच्या उंचवटे व खोलगट रस्ता अपघातास निमत्रंण देऊन निर्दोष लोकांच्या अपघात होण्यास कारणीभुत ठरू शकतात. यास्तव या नविन उडाण पुलाचे डांबरीकरण दर्जेदार व व्यवस्थित त्वरित करण्यात यावे. अशी मागणी केरडी च्या सरपंचा सह केरडी, तेलनखेडी ग्रामस्थानी संबधित प्रशासनाला केली आहे.